पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तान संघाला वेगवान गोलंदाजांचा मोठा वारसा असून शोएब अख्तर हे त्या गौलंदाजांपैकी सर्वात मोठे नाव आहे. रावलपिंडी एक्सप्रेस नावाने ओळखल्या जाणाऱ्या अख्तरला 2002 साली पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदाचा प्रस्ताव मिळाला होता. पण त्याने स्वतहून हा प्रस्ताव नाकारला, असे अख्तरने सांगितले.
शोएब अख्तर (Shoaib Akhtar) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आतापर्यंतचा सर्वात घातक वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याच्या नावावर 161 किलोमीटर ताशी गतीचा सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम आहे. अख्तरच्या या घातक गोलंदाजीपुढे भले-भले फलंदाज शरणागती पत्करताना मिळाले. अशात पाकिस्तान संघाचे कर्णधारपद मिळणे नक्कीच त्याच्यासाठी मोठी गोष्ट नव्हती. पण त्याने स्वतःहून पाकिस्तान संघाचा कर्णधार होण्यास नकार दिला होता, असा खुलासा अख्तरने एका कार्यक्रमात केला.
‘या’ कारणास्तव अख्तरने नाही स्वीकरले पाकिस्तानचे कर्णधारपद
शोएब अख्तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत आला आहे. त्याच्या रोखठोक बोलण्यामुळे तो नेहमीच चर्चेत देखील राहतो. एका पाकिस्तानी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत अख्तरने त्याला कर्णधारपादाची प्रस्ताव मिळाल्याचा खुलासा केला. मुलाखातीत अख्तर म्हणाला की, “मी पूर्णपणे फिट नव्हतो. मी पाच पैकी केवळ तीन सामनेच खेळू शकत होतो. मला 2002 साली कर्णधारपदासाठी विचारणअयात आले होते. पण त्यावेळी मी केवळ दीड ते दोन वर्ष अजून क्रिकेट खेळू शकणार होतो.”
“मी सहकारी खेळाडूंचे समर्थन केले, पण तेव्हा क्रिकेट बोर्ड खूपच अस्थिर होते. संपूर्ण क्रिकेट बोर्डात अव्यवस्थ पसलेली होती. पाकिस्तानमध्येही त्यावेळी खूप जास्त अव्यवस्था होती,” असे अख्तर पुढे म्हणाला. अख्तरने याच मुलाखतीत पीसीबीचा अध्यक्षपदाची इच्छा व्यक्त केली. मागच्या काही महिन्यांमध्ये पीसीबीत अनेक फेरबदल झाल्याचे दिसले. रमीज राजा यांनी पीसीबी अध्यक्षपद सोडल्यानंतर नजम सेठी यांनी पुन्हा एकदा हा पदभार स्वीकरला. अशात आता अख्तरने देखील पीसीबी अध्यक्ष बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. येत्या काळात देखील पीसीबीमध्ये काही महत्वाचे बदल पाहायला मिळू शकतात.(Shoaib Akhtar would have become the captain of Pakistan in 2002, but know what got in the way.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023पूर्वी बेन स्टोक्सकडून सीएसकेला धक्का! अर्ध्यातून सोडणार धोनी ब्रिगेडची साथ
निवृत्तीच्या 15 दिवसांनंतरच फिंचने घेतला कमबॅकचा निर्णय! पुन्हा पाडणार चौकार-षटकारांचा पाऊस