---Advertisement---

वनडे मालिकेपुर्वी श्रेयस अय्यरने घेतला मोठा निर्णय, इंग्लंडमध्ये ‘या’ संघाकडून खेळणार वनडे सामने

On: मंगळवार, मार्च 23, 2021 8:17 AM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने ३-२ ने विजय मिळवला आहे. या मालिकेत भारतीय संघाकडून मध्यक्रमात श्रेयस अय्यरने महत्वाची भूमिका बजावली. गेल्या काही महिन्यांपासून तो भारतीय संघासाठी मधल्या फळीत मोलाचे योगदान देत आहे.

मंगळवारपासून (२३ मार्च) इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेतही श्रेयस भारतीय संघासाठी मधल्या फळीत फलंदाजी करताना दिसेल. त्याची मागील काही वर्षांतील कामगिरी पाहता त्याला इंग्लंडच्या देशांतर्गत वनडे स्पर्धा ‘रॉयल लंडन कप’मध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे.

त्यामुळे आयपीएल २०२० हंगामात दिल्ली कॅपिटल संघाला अंतिम फेरीपर्यंत घेऊन जाणारा फलंदाज आणि कर्णधार श्रेयस हा लवकरच काउंटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. २२ जुलै पासून सुरु होणाऱ्या रॉयल लंडन कप स्पर्धेत तो लंकाशर संघाकडून खेळताना दिसणार आहे. त्याने लंकाशर संघासोबत करार केला आहे. तसेच तो १५ जुलैपासून संघासोबत जोडला जाईल. लंकाशर संघाचा पहिला सामना २३ जुलै रोजी ससेक्स संघाविरुद्ध होणार आहे. याबाबतची माहिती काउंटी संघाने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डल वरून दिली आहे.

काउंटी क्रिकेटशी करार केल्यानंतर श्रेयस म्हणाला की, “लंकाशर, इंग्लिश क्रिकेटमध्ये खूप मोठा संघ आहे आणि या संघाचे भारतीय संघासोबत वेगळे नाते आहे. मला फारुख इंजिनियर, सौरव गांगुली आणि वीवीएस लक्ष्मण यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी खूप अभिमान होत आहे.”

भारतीय संघाकडून माजी यष्टीरक्षक फारुक इंजिनियर यांना काउंटी क्रिकेटमध्ये दिग्गज खेळाडू मानले जाते. यासोबतच भारतीय संघाकडून सौरव गांगुली, वीवीएस लक्ष्मण, मुरली कार्तिक आणि दिनेश मोंगिया यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी देखील काउंटी क्रिकेट खेळले आहेत.

श्रेयस अय्यरची कामगिरी
श्रेयस अय्यर मधल्या फळीत भारतीय संघासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. त्याने भारतीय संघासाठी खेळताना टी-२० क्रिकेटमध्ये एकूण २८ सामने खेळले आहेत. यात त्याने २८.९ च्या सरासरीने ५५० धावा केल्या आहेत. यात ३ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच एक दिवसीय आंतरराष्ट्रीय करिकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने एकूण २१ सामने खेळले आहेत. यात त्याने ४४.८ च्या सरासरीने ८०७ धावा केल्या आहेत. यात ८ अर्धशतक आणि १ शतक झळकावले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘कॅप्टनकूल’ धोनी झालाय दुकानदार, रांची शहरात थाटलंय ‘या’ गोष्टीच दुकान

क्रिकेटसाठी काय पण! दुखापत झाली असतानाही पायावर पट्टी बांधून सचिनने खेळली फायनल

INDvENG: पुण्याच्या मैदानावर नाणेफेकीचा किती परिणाम? जाणून घ्या कशी असेल खेळपट्टी आणि वातावरण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---