इंडियन प्रीमिअर लीग इतिहासातील सर्वात मोठा ट्रेड सोमवारी (27 नोव्हेंबर) पाहायला मिळाला आहे. आयपीएल 2024 स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्या याला गुजरात टायटन्सकडून ट्रेड करत संघात घेतले. त्यानंतर गुजरातने आयपीएल 2024साठी आपला कर्णधार म्हणून शुबमन गिल याच्या नावावर शिक्कामोर्तब केले. वयाच्या केवळ 24 व्या वर्षी त्याला ही संधी मिळाली. मात्र, असे असले तरी तो आयपीएल इतिहासातील नववा सर्वात तरुण कर्णधार बनला.
आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात पूर्ण वेळ काढून बनण्याच्या बाबतीत गिल तिसऱ्या क्रमांकावर राहिला. याबाबतीत त्याच्या पुढे दिल्ली कॅपिटल्सचे माजी कर्णधार श्रेयस अय्यर व रिषभ पंत आहेत. या दोघांनीही वयाचे 24 वर्षे पूर्ण करण्याआधीच संघाचे नेतृत्व हातात घेतले होते. त्यानंतर आता गिल या यादीत समाविष्ट झाला आहे.
आयपीएल इतिहासात सर्वात कमी वयात नेतृत्व करण्याचा बहुमान विराट कोहली याला मिळाला होता. त्याने केवळ 22 वर्षे 4 महिने व 6 दिवस इतक्या वयाचा असताना पहिल्यांदा आरसीबीचे नेतृत्व केलेले. तर, स्टीव्ह स्मिथ याने 22 वर्ष 11 महिने व 9 दिवस इतके वय असताना पहिल्यांदा आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्स इंडिया संघासाठी कर्णधारपद भूषवलेले. तर सुरेश रैना याला देखील 23 वर्ष 3 महिने इतक्या वयाचा असताना कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळालेली.
राशिद खान याला देखील 23 व्या वर्षीच आपल्या संघाचे नेतृत्व करावे लागले होते. या व्यतिरिक्त दिनेश कार्तिक याने 24 व्या वर्षी दिल्ली डेअरडेव्हिल्सचे तर सॅम करन याने देखील 24 व्या वर्षीच पंजाब किंग्सचे नेतृत्व केलेले.
(Shubman Gill Becomes Third Youngest Full Time Captain In IPL History)
महत्वाच्या बातम्या –
“त्यादिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ…”, वर्ल्डकप फायनलच्या पराभवाविषयी शास्त्रींचे मोठे वक्तव्य
एमएसएलटीए 25हजार डॉलर पुरुष आयटीएफ टेनिस स्पर्धेत भारताच्या रामकुमार रामनाथन याला दुहेरी मुकुट