राजकोट। आज(7 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात दुसरा टी20 सामना(2nd T20I) सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Saurashtra Cricket Association Stadium, Rajkot) होत आहे.
हा सामना भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माचा(Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 100 वा टी20(100th T20I) सामना ठरला आहे.
तो आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 100 किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळणारा हरमनप्रीत कौर(Harmanpreet Kaur) नंतरचा दुसराच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
विशेष म्हणजे कौरनेही भारतीय महिला संघाकडून 100 आंतरराष्ट्रीय टी20 सामने(100th T20I) खेळले आहेत. त्यामुळे ती भारतीय महिला संघाकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळणारी क्रिकेटपटू आहे. तर रोहित भारतीय पुरुष संघाकडून सर्वाधिक टी20 सामने खेळणारा क्रिकेटपटू आहे.
याव्यतिरिक्त रोहित आणि कौरमध्ये आणखीही खास साम्य आहेत. रोहित हा भारताकडून टी20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा पुरुष क्रिकेटपटू आहे. तर कौरनेही भारतीय महिला संघाकडून टी20मध्ये सर्वाधिक षटकार मारले आहेत. रोहितने 109 षटकार मारले आहेत. तर कौरने 56 पेक्षा अधिक षटकार मारले आहेत.
तसेच भारताकडून कर्णधार म्हणून टी20 मध्ये शतकी खेळी करण्याचा विक्रमही रोहित आणि कौरच्या नावावर आहे. कौरने भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार म्हणून टी20 मध्ये 1 शतक केले आहे. तर रोहितने भारतीय पुरुष संघाचा कर्णधार म्हणून टी20 मध्ये 2 शतके केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहितआधी १०० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणाऱ्या भारतीय खेळाडूचे नाव मात्र लोकांना माहित नाही
वाचा-????https://t.co/68sW2pAxdd#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @beyondmarathi #INDvBAN— Maha Sports (@Maha_Sports) November 7, 2019
भारत विरुद्ध बांगलादेश: पहिल्या कसोटीसाठी एवढ्या तिकीटांची झाली विक्री
वाचा-???? https://t.co/M34p38cQhC#म #मराठी #INDvBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 7, 2019
भारताच्या पहिल्या दिवस-रात्र कसोटीत खास नाण्याने होणार नाणेफक!
वाचा-???? https://t.co/SkQP5DgE3Y#म #मराठी #INDvBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 7, 2019