कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे सर्व क्रीडास्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. परंतु अशामध्ये आयसीसी वनडे विश्वचषक विजेत्या इंग्लंड संघाचा कर्णधार ओयन मॉर्गनने आपले मत व्यक्त केले आहे.
मॉर्गन (Eoin Morgan) यावेळी म्हणाला की, जर कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट सत्र जर लहान झाले, तर इंग्लंडचा संघ एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन वेगळे संघ खेळवू शकतो. आम्ही असं करण्यास सक्षम आहोत.
मॉर्गनने सांगितले की, जो रुटच्या (Joe Root) नेतृत्वात इंग्लंडचा कसोटी संघ जुलै महिन्यामध्ये वेस्ट इंडीज (West Indies) किंवा पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) खेळू शकते. या दोन संघाविरुद्ध ३-३ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे.
तसेच मॉर्गनच्या नेतृत्वातील इंग्लंडचा (England) संघ याचवेळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) वनडे किंवा आंतरराष्ट्रीय टी२० मालिका खेळू शकतो.
आपली बाजू मांडत मॉर्गन यावेळी म्हणाला की, हा एक कठीण काळ आहे. यामध्ये आम्हाला अशाच प्रकारच्या प्रत्येक पर्यायांवर विचार करावा लागेल. तसेच पुढे तो म्हणाला की, अशी वेळ यापूर्वी आम्ही कधीही पाहिली नव्हती. आर्थिकदृष्ट्या आणि खेळाच्या बाबतीतही ही एक विषम परिस्थिती आहे.
कोरोना व्हायरसच्या हाहाकारामुळे इंग्लंडमध्ये कोणत्याही प्रकारचा क्रिकेट सामना २८ मेपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. इंग्लंडचा संघ ४ जूनपासून वेस्टइंडीज दौऱ्यावर जाणार आहे. मॉर्गन यावेळी म्हणाला की, एक खेळाडू म्हणून आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करू. तसेही आम्ही परिस्थिती सामान्य होईपर्यंत खेळाबद्दल विचार करत नाही.
महा स्पोर्ट्स टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@MahaSports) जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या क्रीडा घडामोडी मिळवा.
ट्रेंडिंग घडामोडी –
–३ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ज्यांनी केले आहे महिला क्रिकेटरशी लग्न
–१० भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी व त्या करत असलेलं काम
–घटस्फोटीत महिलांशी लग्न करणारे ५ भारतीय क्रिकेटर्स
–दोन वेळा लग्न केलेले १२ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू, ५ नावे आहेत भारतीय






