भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023-25 सायकलची सुरुवात दिमाखात केली. वेस्ट इंडिजविरुद्ध डॉमिनिका येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 1 डाव आणि 141 धावांनी शानदार विजय मिळवला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने 271 धावांच्या आघाडीसह डाव घोषित केला होता. यावेळी यजमानांना विजयासाठी 272 धावांची आवश्यकता होती, परंतु ते फक्त 130 धावांवर सर्वबाद जाले. या विजयात यशस्वी जयसवाल (171 धावा) आणि आर अश्विन (12 विकेट्स) यांनी सिंहाचा वाटा उचलला. या विजयानंतर कर्णधार रोहित भलताच खुश झाला. तो यावेळी डाव संपण्यावेळी ईशान किशनला इशारा करताना दिसला होता. याबाबतही त्याने भाष्य केले.
विजयाविषयी बोलताना रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की, “प्रत्येक धाव खूप महत्त्वाची असते. पहिल्या डावात 150 धावांवर त्यांना सर्वबाद केल्यामुळे सामना सेट झाला होता. आव्हानात्मक खेळपट्टीवर आम्ही चांगले खेळलो आणि 400हून अधिक धावा केल्या.”
ईशान किशनला काय म्हणत होता रोहित?
रोहित शर्मा डाव संपण्याची घोषणा करण्यापूर्वी ईशान किशन (Ishan Kishan) याला इशारा करताना दिसला होता. त्याने सांगितले की, “मी ईशानला फक्त म्हणत होतो की, त्याने आपली पहिली धाव काढावी. मी समजू शकतो की, तो ड्रेसिंग रूममध्ये फलंदाजीसाठी खूप उत्सुक होता. त्यामुळे मला वाटत होते की, त्याने किमान एक तरी धाव काढावी.”
Rohit signalled Ishan to get a run on his debut so he can declare pic.twitter.com/BAaM4khIe7
— Abhishek (@be_mewadi) July 14, 2023
जयसवालविषयी काय बोलला रोहित?
यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) याने त्याच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात 171 धावांची वादळी शतकी खेळी साकारली. त्यासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. कर्णधार रोहित शर्मा याने त्याचे कौतुक करत म्हटले की, “यशस्वी जयसवाल याने मागील एक-दोन वर्षांमध्ये दाखवून दिले आहे की, तो या स्तरासाठीच बनला आहे. हा सामना त्याच्या स्वभावाची कसोटी पाहणारा होता. त्याने चांगली कामगिरी केली. जर तो क्रीझवर आनंद घेत राहिला, तर त्याला निकालही मिळतील.”
डब्ल्यूटीसी स्पर्धेविषयी बोलताना रोहित म्हणाला की, “जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या नवीन सायकलची सुरुवात चांगली झाली आहे. आम्ही परिस्थितीविषयी जास्त चिंता करत नाही. आम्हाला फक्त पुढच्या सामन्यातही अशीच विजयी कामगिरी करायची आहे.”
या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने शानदार फलंदाजी केली. त्याने भारताच्या पहिल्या डावात 103 धावा केल्या. यामध्ये 2 षटकार आणि 10 चौकारांचा समावेश होता. हे रोहितचे कसोटीतील 10वे शतक होते. (skipper rohit sharma on inning declared and ishan kishan said this read here)
महत्वाच्या बातम्या-
भारताने सामना तर जिंकलाच, पण विराटचा डान्सने लुटली सगळी वाहवा; ‘किंग’ कोहलीचे ठुमके वेधतायत लक्ष
लेकाने शतक ठोकताच कांवड घेऊन यात्रेला निघाले वडील; म्हणाले, ‘यशस्वीने फक्त…’