भारताचा महान माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली अनेक क्रिकेटपटूंची कारकीर्द बहरली आहे. यात विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग यांचाही समावेश आहे. त्यामुळे ते गांगुलीच्या अनेक सवयींशी परिचीत आहेत.
युवराज सिंग आणि विरेंद्र सेहवागने गांगुलीच्या बाबतचे असे अनेक गमतीशीर किस्से गांगुलीच्या ‘अ सेन्चुरी इज नॉट इनफ’ या आत्मचरित्राच्या अनावरण कार्यक्रमात सांगितले होते.
असाच एक गांगुलीच्या कीट बॅगच्या बाबतचा किस्सा सेहवागने या कार्यक्रमात सांगितला आणि याला युवराजनेही पाठीेबा दिला.
सेहवाग म्हणाला, “जेव्हा आम्ही आत ड्रेसिंग रूममध्ये यायचो तेव्हा गांगुली आम्हाला त्याची कीट बॅग आवरायला सांगायचा. त्याला सामना संपला की लगेच पत्रकार परिषदेसाठी जायची घाई असायची, त्यामुळे तो आम्हाला त्याची कीट बॅग आवरायला सांगायचा. अगदी धोनीही त्याची कीट बॅग आवरायचा”
पण यावर गांगुलीने थोडे मजेशीर उत्तर देताना सांगितले की “ही गोष्ट पूर्णपणे सत्य नाही. खरंतरं मला पत्रकार परिषदेसाठी जायची घाई आसायची आणि युवराजला नाईट आऊटला जायचं असायचं त्यासाठी आम्हाला उशीर करायचा नसायचा.”
“हा यामागचा गुपीत हेतू होता. त्यामुळे युवराज सामना संपला की माझी कीट बॅग लवकर आवरायचा. ” गांगुलीच्या या उत्तरावर प्रेक्षकांना मात्र हासू आवरता आले नाही.
गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान
– गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण