मागील आठवड्यात भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राज्यातील मुलांच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त केली जात होती. या सर्व घडामोडींमध्ये सोलापूरचा मल्ल महिंद्र गायकवाडने महाराष्ट्राची आणि देशाची मान उंचावणारी कामगिरी केली आहे. बहारीन येथील २० वर्षाखालील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात त्याने रौप्य पदक आपल्या नावे केले.
*!! हार्दिक अभिनंदन !!*
*आज दिनांक १० जुलै रोजी मनामा (बाहरिन) येथे सुरू असलेल्या U/ २० आशियाई फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत १२५ किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या महेंद्र गायकवाड याने रोप्य पदक पटकावले pic.twitter.com/cCV3SuRZfw— Maharashtra State Wrestling Association म.रा.कु.प. (@StateMswa) July 10, 2022
सध्या बहारीन येथील मनामा या ठिकाणी २० वर्षाखालील आशियाई फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धा सुरू आहेत. त्यातील १२५ किलो वजनी गटात भारताच्या महेंद्र गायकवाडने रौप्य पदक आपल्या नावे केले. त्याला अंतिम फेरीत गुणांवर इराणच्या सालर सईदकडून पराभव पत्करावा लागला. महेंद्र हा मूळचा सोलापूरचा रहिवासी आहे. मात्र, तो मागील काही वर्षांपासून कात्रज येथील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात सराव करतो. अर्जुन पुरस्कार विजेते मल्ल काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तो कुस्तीचे धडे गिरवतो.
महेंद्र गायकवाड याने यावर्षी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतही सहभाग नोंदवला होता. त्याच्याकडून भविष्यात आणखी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदकांची आपल्याला अपेक्षा असल्याचे प्रशिक्षक पवार यांनी म्हटले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रोहित पॅटर्न: तब्बल ११ वर्षांपुर्वीच रोहितने सांगितलं होतं सुर्यकुमारचं भविष्य, पोरगं भविष्यात…
रंगतदार होणाऱ्या वनडे मालिकेत विराटकडून जबराट खेळीची अपेक्षा, नाहीतर…