---Advertisement---

कोण जिंकणार इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिका? सौरव गांगुलीने केली ‘ही’ भविष्यवाणी

On: शनिवार, जुलै 17, 2021 2:08 AM
---Advertisement---

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरूद्ध नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघ आता इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळण्याची तयारी करत आहे. या मालिकेचा पहिला कसोटी सामना ४ ऑगस्ट रोजी खेळला जाईल. पाच सामन्यांची ही मालिका महिनाभर चालेल त्यामुळे दोन्ही संघांना जिंकण्याची पूर्ण संधी मिळेल. या मालिकेत कोण उजवे ठरणार, याविषयी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) प्रमुख सौरव गांगुली यांनी एक मोठी भविष्यवाणी केली आहे.

गांगुली यांनी दिली मालिकेविषयी प्रतिक्रिया
एका मुलाखतीत गांगुली यांना विचारले गेले होते की, ‘भारत आता इंग्लंडबरोबर ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. नुकताच संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना गमावला आहे, तर माजी कर्णधार म्हणून कसोटी मालिकेबद्दल तुमचा काय अंदाज असेल?

त्याला उत्तर देताना गांगुली म्हणाले, “कसोटी मालिकेचा अंदाज बांधता येत नाही. भारताने चांगले क्रिकेट खेळले आहे. केवळ एक सामना खराब गेल्याने संघ चांगला की वाईट हे ठरविणे योग्य नाही. इंग्लंडविरुद्धची मालिका दीर्घ असल्याने मालिकेत दोन्ही संघांना समान संधी असेल. या मालिकेत पिछाडीवर पडल्यानंतरही संघ पुनरागमन करू शकतात.”

गांगुली यांना कसोटीत भारताच्या सलामीच्या जोडीबद्दल विचारले गेले तेव्हा त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. आम्ही यामध्ये हस्तक्षेप करत नाही. हा संघ व्यवस्थापनाचा निर्णय असतो, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

भारताचा इंग्लंड दौरा २०२१
४-८ ऑगस्ट – पहिला कसोटी सामना, नॉटिंघम
१२-१६ ऑगस्ट – दुसरा कसोटी सामना, लॉर्ड्स
२५-२९ ऑगस्ट – तिसरा कसोटी सामना, हेडिंग्ले
२-६ सप्टेंबर – चौथा कसोटी सामना, ओव्हल
१०-१४ सप्टेंबर – पाचवा कसोटी सामना, मॅंचेस्टर

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धिमान साहा.
राखीव खेळाडू- अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागासवाला

महत्त्वाच्या बातम्या –

‘तुझ्यात अजून क्रिकेट शिल्लक आहे’ दिनेश कार्तिकला ‘हिटमॅन’ने करून दिली आठवण

सानियाला मिळला ‘या’ देशाचा गोल्डन व्हिसा, सुरु करणार स्वतःची अकादमी

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी भारतीय खेळाडूंनी कसली कंबर; फ्लड लाइट्समध्ये केला जोरदार सराव, व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---