जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्याचा आज ‘राखीव दिवस’ आहे. सामन्याच्या पहिल्या व चौथ्या दिवशी पावसाच्या थैमानामुळे त्या दिवशीचा खेळ रद्द करण्यात आला व उर्वरीत ३ दिवसांतही पूर्णपणे ९० षटकांचा खेळ होऊ शकला नाही आहे. या सामन्यात आतापर्यंत केवळ २२१ षटक टाकण्यात आली आहेत. त्यामुळे आजचे साउथॅम्प्टनमधील वातावरण कसे असेल यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
साउथॅम्प्टनमध्ये आज पावसाची शक्यता नाही असे सांगितले जात आहे. परंतु मैदानावर थोडेफार ढगाळ वातावरण आहे. अशा हवामानात न्यूझीलंडचे वेगवान गोलंदाज भारतीय संघासाठी खूप घातक ठरू शकतात.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात २१७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने डेवॉन कॉनवे (५४ धावा) आणि केन विलियम्सन (४९ धावा) यांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर पहिल्या डावात २४९ धावा केल्या आणि ३२ धावांची आघाडी घेतली.
पाचव्या दिवशी अखेरच्या सत्रात भारताला फलंदाजीची संधी मिळाली. टीम साउदीने उत्कृष्ट गोलंदाजी करत भारतीय सलामीवीर शुभमन गिल (०८) आणि रोहित शर्मा (३०) यांना तंबूत धाडले. दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने दोन गडी गमावत ६४ धावा केल्या आहेत. भारताकडे आता ३२ धावांची आघाडी आहे. खेळपट्टीवर चेतेश्वर पुजारा १२ धावा तर विराट कोहली ८ धावांवर करत खेळत आहे.
आज न्यूझीलंडचे गोलंदाज पुजारा आणि कोहलीची विकेट लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करतील. जर मैदानात ढगाळ वातावरण राहिले तर न्यूझीलंडचे वेगवान गोलंदाज भारतीय संघासाठी घातक ठरू शकतात. साऊदी, ट्रेंट बोल्ट, काईल जेमिसन आणि नील वॅग्नर आपल्या स्विंग गोलंदाजीमुळे भारतीय संघाच्या फलंदाजांना शरणागती आणू शकतात. पहिल्या डावात न्यूझीलंडच्या सर्व गोलंदाजांनी धोकादायक गोलंदाजी केली होती.
जर राखीव दिवशीच्या खेळात खराब प्रकाशामुळे व्यत्यय आला नाही. तर सामना ९८ षटके पूर्ण होईपर्यंत खेळला जाऊ शकतो. जर हा ऐतिहासिक सामना अनिर्णित किंवा बरोबरीत सुटल्यास दोन्ही संघ संयुक्त विजेते म्हणून घोषित केले जातील.
महत्वाच्या बातम्या
सेव्ह द डेट विथ क्रिकेट! आज रंगणार ९ क्रिकेट सामन्यांचा थरार, WTC फायनलचा लागेल निकाल
कर्णधार कोहलीच्या चाणाक्ष रणनितीपुढे न्यूझीलंडचे लोटांगण, समालोचकांनी तोंडभरुन केली स्तुती
‘बस्स, आता ब्रेकअप’! किवी गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे गिल सपशेल फ्लॉप अन् सारा झाली ट्रोल