मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात क्रिकेट विश्वचषक 2023 चा उपांत्य सामना खेळवला गेला. या सामन्यात संपूर्ण स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. यासोबतच देश-विदेशातील बड्या दिग्गजांनीही भारतीय संघाला चिअर करण्यासाठी सामना पाहण्यासाठी हजेरी लावली होती.
इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम विश्वचषकाची सेमीफायनल पाहण्यासाठी दाखल झाला होता. फुटबॉलपटूशिवाय सचिन तेंडुलकर वानखेडेच्या बाल्कनीत दिसला. स्टेडियममध्ये बॉलीवूड कलाकारांचा मेळाही पाहायला मिळाला. परंतु या सगळ्यात जास्त मार्केट खाल्लं ते साऊथचा सुपर हिरो रजनीकांत यांनी.
सुपरस्टार रजनीकांत यांना या सामन्यासाठी गोल्डन तिकीट देण्यात आले होते. भारताने हा सामना रजनीकांत यांच्यामुळेच जिंकला असं काही चाहत्यांचं म्हणनं आहे, कारण विश्वचषक 2011 जेव्हा भारताने जिंकला होता तेव्हाही रजनीकांत वानखेडे मैदानावर उपस्थित होते. आणि 2023 चा पहिला उपांत्य सामनाही वानखेडे स्टेडियमवर झाला आणि ते इथे उपस्थित होते.
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला कर्णधार रोहित शर्मा याने चांगली सुरुवात करून दिली. भारतीय प्रेक्षकांनी रोहितच्या फलंदाजीचा खूप आनंद घेतला. मुंबईचे वानखेडे स्टेडियमही अनेक सेलिब्रिटींनी फुलले होते. ज्यामध्ये क्रिकेट आणि फुटबॉलसह अनेक मोठे चेहरे आणि सेलिब्रिटी उपस्थित होते.
Legendary #SunilGavaskar Paji in commentary :
“Southern superstar..National Superstar…’
“how he was a lucky charm in 2011 and will be again now. When he is there we won’t lose. “#SuperstarRajinikanth ❤️❤️❤️#Rajinikanth | #superstar @rajinikanth— Suresh balaji (@surbalutwt) November 15, 2023
भारत विरूद्ध न्यूझीलंड सेमीफायनल पाहण्यासाठी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर व्यतिरिक्त अनेक चित्रपटसृष्टीही आली होती. तेलुगू अभिनेता व्यंकटेश याने वेस्ट इंडिजचा दिग्गज माजी खेळाडू व्हिव्हियन रिचर्ड्ससोबतचा एक फोटो शेअर केला आहे. दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर असलेल्या हार्दिक पांड्यासोबतच अभिनेता जॉन अब्राहमही बाल्कनीत सामना पाहताना दिसला.
याशिवाय शाहिद कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा पत्नी कियारा अडवाणीसोबत सामना पाहण्यासाठी आला होता. सामना पाहण्यासाठी विकी कौशल, कुणाल खेमू, अभिनेत्री माधुरी दीक्षितसह अनेक बडे चेहरे प्रेक्षकांच्या गॅलरीत सामन्याचा आनंद घेताना दिसले. भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि सूर्यकुमार यादव यांच्या पत्नीही स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आल्या होत्या. (Special guest arrives at Wankhede for India vs New Zealand semi-final Fans say because of this victory)
म्हत्वाच्या बातम्या
शमीने विश्वचषकात मोठा विक्रम रचत ऑस्ट्रेलियन दिग्गज गोलंदाजाला दिला धोबीपछाड
‘मी तसे करायला नको होते…’, विश्वविक्रमी गोलंदाजी प्रदर्शनानंतर असे का म्हणाला शमी? लगेच वाचा