वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला 11 दिवसांचा कालावधी उरला आहे. 5 ऑक्टोबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यासाठी सर्व संघांनी तयारीला सुरुवात केली आहे. मात्र, विश्वचषकापूर्वी श्रीलंका संघाला मोठा धक्का बसला आहे. वृत्तांनुसार, हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे श्रीलंका संघाचा फिरकीपटू वनिंदू हसरंगा विश्वचषक संघातून बाहेर पडला आहे. लंका प्रीमिअर लीग स्पर्धेत खेळताना दुखापतग्रस्त झाल्यानंतर तो संघाबाहेर पडला होता. त्यानंतर तो पुन्हा दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो आशिया चषक 2023 स्पर्धेतही खेळू शकला नव्हता.
हा श्रीलंका संघासाठी मोठा झटका मानला जात आहे. कारण, वनिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) मागील काही काळापासून जबरदस्त प्रदर्शन करत आहे. इतकंच नाही, तर त्याने श्रीलंकेला विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी क्वालिफाय करण्यातही मोलाची भूमिका बजावली होती. याव्यतिरिक्त त्याला भारतीय परिस्थितीचीही चांगली माहिती आहे. तो आयपीएल 2023 हंगामातही चांगले प्रदर्शन करण्यात यशस्वी झाला होता.
Wanindu Hasaranga ruled out of the World Cup 2023. [Sports Hour] pic.twitter.com/SUJhColTHg
— Johns. (@CricCrazyJohns) September 24, 2023
हसरंगा श्रीलंकेचा महत्त्वाचा खेळाडू आहे. तो महत्त्वाचा गोलंदाज असण्यासोबतच फलंदाजीतूनही चांगले योगदान देतो. तो श्रीलंका संघाच्या फलंदाजी क्रमात खालच्या फळीत फलंदाज म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतो. अशात या स्पर्धेत श्रीलंका संघाला त्याची उणीव भासू शकते.
खरं तर, श्रीलंका संघाकडे हसरंगाच्या बदली खेळाडूची घोषणा करण्यासाठी फक्त 4 दिवस उरले आहेत. कारण, विश्वचषकासाठी सर्व संघांना आपले अंतिम स्क्वॉड घोषित करण्यासाठी 28 सप्टेंबर ही मुदत देण्यात आली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून अद्याप हसरंगाबाबत अधिकृत घोषणा व्हायची आहे. विशेष म्हणजे, विश्वचषकासाठी श्रीलंका संघाचीही घोषणा झाली नाहीये. वृत्तांनुसार, हसरंगा विश्वचषकात खेळू शकणार नाहीये.
हसरंगाच्या कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने श्रीलंकेकडून आतापर्यंत 48 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 67 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 4 अर्धशतके आणि 832 धावाही निघाल्या आहेत. (spinner wanindu hasaranga ruled out of 2023 world cup with hamstring injury)
महत्त्वाच्या बातम्या-
Toss: विजय मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाने बदलला कर्णधार, भारताच्या ताफ्यात ‘या’ खेळाडूची एन्ट्री
ना दुखापत, ना कसला त्रास, तरीही बुमराह दुसऱ्या वनडेतून बाहेर; BCCIने सांगितलं मोठं कारण