बीसीसीआयने सोमवारी 12 सप्टेंबरला आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी संघ घोषित केला. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीमुळा नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषकात खेळू शकले नव्हते. आता या दोघांचे संघात पुनरागमन झाले असून विश्वचषक संघात त्यांना संधी दिली गेली आहे. माध्यमांशी बोलताना भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांना पत्रकाराने विचारलेल्या एका प्रश्नावर स्पष्ट उत्तर दिले.
वेगवान गोलंदाज हर्षल पटेल (Harshal Patel) आगामी टी-20 विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात सहभागी आहे. काहीच्या मते ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या या टी-20 विश्वचषकात ज्या गोलंदाजांकडे कदी आहे, त्यांना अधिक फायदा मिळेल. सुनील गावसकर (Sunil Gavaskar) माध्यमांशी बोलत असताना देकील पत्रकाराने याच पार्श्वभूमीवर एक प्रश्न विचारला, परंतु माजी कर्णधार त्याच्या या प्रश्नाशी सहमत असल्याचे दिसले.
पत्रकाराने विचारले की, “ऑस्ट्रेलियात हर्षल पटेलची धुलाई होईल, कारण त्याच्याकडे जास्त गती नाहीये आणि त्याठिकाणी ज्या पद्धतीची खेळपट्टी असते, ती पाहता तो खूप धावा खर्च करेल?” पत्रकाराच्या या प्रश्नावर गावसर स्पष्ट उत्तर देत म्हणाले की, “पुढे जाऊन पाहू ना की, त्याची धुलाई कशी होईल ते. तुम्ही आधीच ठरवले आहे की, धुलाई होईल. कारण काय तर त्याच्याकडे गती नाहीये. अरे आधी सामना तर होऊद्या, नंतर तुम्ही म्हणू शकता, असे झाले, तसे झाले.”
दरम्यान, हर्षल आणि बुमराह दुखापतीमुळे आशिया चषक 2022 मधून बाहेर झाले होते. पण मध्यंतरीच्या काळात त्यांनी स्वतःची फिटनेस पुन्हा मिळवली आणि संघात पुनरागमन देखील केले आहे. टी-20 विश्वचषकात उतरण्यापूर्वी त्यांना लय मिळवण्यासाठी संधी मिळणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघाविरद्ध टी-20 विश्वचषकापूर्वी खेळल्या जाणाऱ्या टी-0 मालिकेत त्यांना निवडले गेले आहे.
टी२० विश्वचषकासाठी अशी आहे १५ सदस्यीय भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सुर्यकुमार यादव, दिपक हुडा, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, रविचंद्रन अश्विन.
स्टॅंडबाय- मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिष्णोई आणि दिपक चहर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
टी20 वर्ल्डकपसाठी इंग्लंडचा मास्टर प्लॅन! ‘मिशन मेलबर्न’करीता खास ऑस्ट्रेलियन नियुक्त
पत्नीकडून सूर्यकुमारला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा; खास फोटो पोस्ट करत लिहिले, ‘हॅप्पी बर्थडे बेबी…’
जेव्हा ‘बॉल आउट’द्वारे भारताने पाकिस्तानला दिला होता धोबीपछाड, 3-0ने जिंकला होता सामना