---Advertisement---

कृणालमुळे सूर्या अन् पृथ्वीच्या मार्गात खोडा, इंग्लंडला जाणं ‘कॅन्सल’! बीसीसीआय नव्या पर्यायांच्या शोधात

On: गुरूवार, जुलै 29, 2021 5:26 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचे युवा क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांच्यासाठी एक मोक्याची संधी स्वत:हून चालून आली होती. सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातील ३ खेळाडू शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान दुखापतींमुळे आगामी कसोटी मालिकेतून बाहेर झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याजागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या दोघांना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

परंतु आता असे वृत्त पुढे येत आहे की, सूर्यकुमार आणि पृथ्वीचे इंग्लंडला जाणे जवळपास अशक्य असून बीसीसीआयने नव्या पर्यांयाचा शोध सुरू केला आहे. ४ ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे.

बीसीसीआय नव्या पर्यायांच्या शोधात
काही दिवसांपुर्वीच श्रीलंका दौऱ्यावर असलेला भारतीय अष्टपैलू कृणाल पंड्या कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या क्रिकेटपटूंनाही ७ दिवस आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. यामध्ये सूर्यकुमार आणि पृथ्वी या दोघांचाही समावेश आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, श्रीलंकेत असलेल्या सूर्यकुमार आणि पृथ्वीला त्यांचा आयसोलेशनचा कालावधी संपवण्यासाठी २ ऑगस्टपर्यंतचा अवधी लागणार आहे. यानंतर त्यांचे इंग्लंडला जाणे खूप कठीण आहे. कारण इंग्लंडमधील कोरोना नियमांनुसार, जर कोणता व्यक्ती कोविड-१९ संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आला; तर त्या व्यक्तीला १० दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. म्हणजे, इंग्लंडच्या नियमांनुसार दोघांनाही इंग्लंडला रवाना होण्यापुर्वी श्रीलंकेत ५ ऑगस्टपर्यंत आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. यानंतरही त्यांना इंग्लंडला गेल्यावर १० दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे.

इतकेच नव्हे तर, त्यांना इंग्लंडमध्ये १० दिवस क्वारंटाईनमध्ये राहिल्यानंतर पुन्हा ३ दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. तिथे त्यांच्या ३ कोरोना चाचण्या केल्या जातील. या चाचणीत निगेटिव्ह आढल्यानंतरच त्यांना जैव सुरक्षित वातावरणामध्ये प्रवेश दिला जाईल. थोडक्यात सांगायचे झाले तर, कोरोना नियमांमुळे इंग्लंडमधील भारतीय संघासोबत सहभागी होण्यासाठी त्यांना जवळपास २० ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागू शकते. त्यामुळे बीसीसीआय त्यांच्याऐवजी इतर २ खेळाडूंना इंग्लंडला बोलवण्याच्या विचारात आहे.

बीसीसीआयचे एक अधिकारी इनसाइड स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाले की, “आम्ही सध्या यासंदर्भात काहीही सांगू शकत नाही. पुढील २ दिवस आम्ही परिस्थितीवर नियंत्रण ठेवणार आहोत. त्यानंतर सूर्यकुमार आणि पृथ्वीला इंग्लंडला बोलवायचे की नव्या पर्यायी खेळाडूंची निवड करायची?, हा निर्णय घेतला जाईल.”

सूर्यकुमार आणि पृथ्वीसाठी इंग्लंड दौरा असेल फायदेशीर
सूर्यकुमार आणि पृथ्वी यांच्यासाठी इंग्लंडचा दौरा महत्त्वपुर्ण असणार आहे. कारण सूर्यकुमारने आतापर्यंत टी२० आणि वनडे पदार्पण केले आहे. परंतु अद्याप त्याला कसोटी पदार्पणाची संधी मिळालेली नाही. अशात इंग्लंडविरुद्ध तो आपले कसोटी पदार्पण करू शकला असता. दुसरीकडे खराब फॉर्ममुळे कसोटी गतवर्षी कसोटी संघातून बाहेर झालेला पृथ्वी इंग्लंडविरुद्ध पुनरागमन करत कसोटी संघातील आपले स्थान परत मिळवू शकला असता.

महत्त्वाच्या बातम्या-

हार्दिकच्या बॅटनेच केला भारताचा घात! श्रीलंकेच्या फलंदाजाने ‘तो’ खणखणीत षटकार खेचत वळवला सामना

सैनीच्या दुखापतीमुळे लागू शकते ‘या’ गोलंदाजाला लॉटरी, तिसऱ्या टी२०साठी भारताची संभाव्य ‘प्लेइंग इलेव्हन’

निर्णयक टी२० सामना जिंकत मालिका खिशात घालण्यावर भारत-श्रीलंकाची नजर, जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---