भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) तिसरा टी20 सामना शनिवारी (7 जानेवारी) राजकोट येथे खेळला गेला. मालिका निर्णायक असलेल्या या सामन्यात सूर्यकुमार यादवने नाबाद शतकी खेळी केली. त्याच्या या धडाकेबाज खेळीचे चाहत्यांबरोबर भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली यानेही कौतुक केले आहे. विराटने तर सूर्यकुमारचा फोटो इंस्टाग्राम स्टोरीला पोस्ट केला होता. त्याची ही स्टोरीही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्याच्या या स्टोरीला आता सूर्यकुमारने उत्तर दिले असून बीसीसीआयने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सामना संपल्यावर ड्रेसिंग रुमकडे जाताना दिसत आहे. रुममध्ये तो खूर्चीवर बसत स्वत:च्या मोबाईलवर विराटची स्टोरी पाहतो. त्यानंतर त्याने म्हटले, “असे वा स्टोरी ठेवली आहे. भाऊ स्टोरी पण चालेल” आणि रिप्लायमध्ये लिहिले, ‘भाऊ, लवकरच भेटू.’
या सामन्याआधी मालिका 1-1 अशी बरोबरीत होती. मुंबईत झालेला पहिला सामना भारताने 2 धावांनी आणि पुण्यात झालेला दुसरा सामना श्रीलंकेने 16 धावांनी जिंकला होता. यामुळे राजकोटमधील सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा होता. तिसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सौराष्ट्र स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात चाहत्यांना सूर्यकुमारची फटकेबाजी पाहायला मिळाली.
Raw emotions 🎦
A Suryakumar fandom frenzy 👏🏻
A special reply to an Instagram story 😉
Unparalleled love for SKY from his fans as he signs off from Rajkot 🤗#TeamIndia | #INDvSL | @surya_14kumar pic.twitter.com/wYuRKMNv1L
— BCCI (@BCCI) January 8, 2023
या सामन्यात भारताच्या डावात सहाव्या षटकापासून सुरू झालेला सूर्यकुमारचा खेळ शेवटच्या षटकापर्यंत चालला. त्याने 45 चेंडूतच त्याच्या आंतरराष्ट्रीय टी20 मधील तिसरे शतक झळकावले. त्याने 219.61च्या स्ट्राईक रेटने नाबाद 112 धावा केल्या. ही खेळी त्याने 51 चेंडूत 7 चौकार आणि 9 षटकार मारत केली. त्याच्याबरोबरच राहुल त्रिपाठी यानेही 16 चेंडूत 35 धावांची झटपट खेळी केली. गिलही 46 धावा करत बाद झाला. यामुळे भारताने 20 षटकात 5 विकेट्स गमावत 228 धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने चांगली सुरूवात केली, मात्र लवकरच त्यांचा डाव गडगडला. कुशल मेंडिस आणि पथुम निसांका यांच्या विकेट्स एका मागोमाग पडल्या. धनंजया डी सिल्व्हा आणि कर्णधार दसून शनाका यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय गोलंदाजांसमोर त्यांचे एक चालले नाही आणि श्रीलंका 16.4 षटकातच 137 धावांवर गारद झाली.
(Suryakumar Yadav’s reply to Virat Kohli’s Insta story, BCCI Share Video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडे विश्वचषक खेळण्याचे रिषभचे स्वप्न भंगणार? ऑपरेशननंतर समोर आली नवी माहिती
ऐतिहासिक गाबा कसोटी विजेत्यांचा एमसीएकडून विशेष सन्मान! उतरवलेली ऑस्ट्रेलियाची घमेंड