भारतीय संघाला काही वर्षांपूर्वी महेंद्रसिंग धोनीच्या रूपात एक अत्यंत हुशार यष्टीरक्षक मिळाला होता. परंतु, त्याच्या निवृत्तीनंतर ही जबाबदारी प्रामुख्याने रिषभ पंतवर संभाळताना दिसते. पंतने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारतीय संघात यष्टिरक्षक फलंदाज म्हणून आपले स्थान निश्चित केले आहे. पंतने गेल्या काही काळात चांगली कामगिरी देखील केली आहे. त्यामुळे पंतला पुढील अनेक वर्षांसाठी भारतीय संघातील पूर्णवेळचा यष्टिरक्षक म्हणून पाहिले जात आहे. असे असले तरी भारतीय संघात असे ३ यष्टीरक्षक आहेत जे पंतची जागा घेऊ शकतात. येणाऱ्या टी-२० विश्वचषकामध्ये त्यांना संधी मिळू शकते
ईशान किशन –
भारतीय १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार राहिलेल्या ईशान किशन या युवा खेळाडूने आयपीएल सारख्या मोठ्या स्पर्धेत आपला चांगलाच ठसा उमटवला आहे. गेल्या २ वर्षात मुंबई इंडियन्सकडून खेळताना ईशानने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याच्या अशा कामगिरीमुळे त्याला श्रीलंका दौऱ्यातही संधी देण्यात आली होती. तिथेही त्याने चांगली कामगिरी केली. येणाऱ्या काळातही ईशानची अशीच कामगिरी राहिल्यास त्याला टी-२० विश्वचषकामध्ये पंतच्या जागी संधी मिळू शकते.
संजू सॅमसन –
भारतीय क्रिकेट संघात अनेक उत्कृष्ट युवा खेळाडू आहेत. त्यातीलच एक म्हणजे संजू सॅमसन. संजूने गेल्या काही काळात देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलसारख्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. म्हणूनच आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना यंदाच्या १४ व्या हंगामात संजूला कर्णधारपदही देण्यात आले. मात्र, संजूसाठी श्रीलंका दौरा काही खास गेला नाही. पण असे असले तरी २०२० च्या वेळी यूएईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आयपीएलमध्ये संजूने चांगलीच तडाखेबाज फलंदाजी करत धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे यंदाचा टी-२० विश्वचषत यूएईमध्येच खेळवला जाणार आहे. तसेच त्यापूर्वी आयपीएल २०२१ चा उर्वरित हंगामही युएईमध्ये होणार आहे. त्यामुळे सॅमसनला आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधण्याची संधी मिळेल.
केएल राहुल –
भारतीय क्रिकेट संघात एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून राहुलकडे पाहिले जाते. कारण ही तसेच आहे, भारतीय संघात कोणत्याही क्रमांकावर खेळण्याची कसब या खेळाडूंमध्ये आहे, तसेच आयपीएलमध्ये सुद्धा पंजाब किंग्सकडून खेळताना त्याने कर्णधार यष्टीरक्षक आणि महत्त्वाचे म्हणजे फलंदाज म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रिषभ पंतच्या अनुपस्थितीत काही वेळा राहुलने यष्टिरक्षक म्हणून भारतीय संघातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. म्हणूनच येणाऱ्या टी-20 विश्वचषकामध्ये राहुल पंतसाठी मोठा प्रतिस्पर्धी आहे.
महत्वाच्या बातम्या –
–अद्भुत.. अविश्वसनीय! चेंडू आवाक्यात नसूनही डी कॉकने सूर मारत एकाहाती टिपला झेल, पाहा व्हिडिओ
–इंग्लंडमधील स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव, ‘हा’ ५१ वर्षीय दिग्गज आढळला पॉझिटिव्ह
–युएई नव्हे तर ‘या’ देशात होणार टी२० विश्वचषकातील सुरुवातीचे ६ सामने, जाणून घ्या यामागचे कारण