भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) उपांत्यफेरीत पोहचू शकणाऱ्या संघाबाबत भाकित वर्तवले आहे. मात्र, या यादीतून न्यूझीलंड आणि पाकिस्तान या संघांना वगळण्यात आले आहे.
आयसीसी टी20 विश्वचषक 2022 मध्ये, सुपर-12 ची रणधूमाळी सुरू झालेली आहे. सुपर-12 मधील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला 89 धावांनी हरवले. टी20 विश्वचषक 2022 हा ऑस्ट्रेलियामध्ये खेळवला जात असून यजमान ऑस्ट्रेलिया संघ गतविजेता देखील आहे. विश्वचषकाच्या उपांत्यफेरीत कोणते संघ स्थान मिळवू शकतात, याबाबत भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Gaunguly) यांनी भाकित केले आहे. गांगुलीने उपांत्य फेरीच्या यादीतून पाकिस्तान आणि न्यूझीलंडला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
भारतीय संघ 2021 च्या टी20 विश्वचषकात उपांत्यफेरीपर्यंत देखील पोहचू शकला नव्हता. यावर भाष्य करताना गांगुली म्हटला की, ”या गोष्टींवर जास्त लक्ष देण्याची गरज नाही. जे आधी घडून गेलय, त्यावर बोलून काहीही फायदा नाही. भारतीय संघ जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे. विश्वचषकातील सामने हे वेगळे असतात. यात तेच संघ जिंकतात जे त्या दोन-तीन आठवड्यात चांगला खेळ करतात. आत्ता काहिही सांगणे चूकीचे राहील, पण आमचा संघ चांगला आहे. आमच्या संघात मोठे शॉट्स मारणारे खेळाडू आहेत. टी20 मध्ये खेळाडूंचा फॉर्म हा त्या काही तासांमध्ये महत्वपूर्ण ठरतो.”
गांगुलीला जेव्हा उपांत्य फेरीचे निवडण्यास सांगितले तेव्हा तो म्हटला की,” मी भारत, दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांची निवड उपांत्य फेरीसाठी करेल. दक्षिण अफ्रिकेची गोलंदाजी अतिशय चांगली असून ऑस्ट्रेलियामध्ये या बाबीचा फरक पडतो.”
ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या आठव्या टी20 विश्वचषकाच्या सुपर 12च्या पहिल्या सामन्यात आतापर्यंत भारत, न्यूझीलंड, श्रीलंका आणि इंग्लंड यांनी बाजी मारली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“तर आपण हरलो असतो”, स्वतः विराटने सांगितला थरारक सामन्याचा टर्निंग पॉइंट
तब्बल 12 वर्षांचा वनवास अखेर संपला! दिनेश कार्तिकचे ‘ते’ स्वप्न साकार