टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या स्पर्धेत महत्वाची फेरी म्हणजे सुपर 12चे सामने सुरू होण्याआधीच काही धक्कादायक निकाल पाहायला मिळाले आहेत. 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत आतापर्यंत बाराच सामने झाले आहेत. यातील तीन सामन्यांचे निकाल तर चकित करणारेच होते. काही संघांनी उत्तम कामगिरी करत आपली ओळख निर्माण केली आहे.
आयसीसीच्या टी20 क्रमवारीत श्रीलंका आणि वेस्ट इंडिज हे पहिल्या दहामध्ये नव्हते. म्हणून त्यांना विश्वचषकाच्या सुपर 12साठी पहिल्या फेरीचे सामने खेळावे लागले. या दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन सामने खेळले. यामध्ये श्रीलंकेला स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात नामिबियाकडून 55 धावांनी पराभूत व्हावे लागले. श्रीलंका 2014चा टी20 विश्वविजेता आहे. तसेच त्यांनी नुकतेच आशिया चषकही जिंकला. त्यांचा हा पराभव क्रिकेटविश्वात आश्चर्यजनक ठरला. नंतर श्रीलंकेने सलग दोन सामने जिंकत सुपर 12मध्ये प्रवेश केला.
Not the result we wanted 💔, but we will look to bounce back in the matches ahead. #T20WorldCup #RoaringForGlory #SLvNAM pic.twitter.com/Ped5rilyDZ
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) October 16, 2022
दुसरीकडे वेस्ट इंडिजचा संघ शुक्रवारी (21 ऑक्टोबर) पहिल्या फेरीतच गारद झाला. तसेच त्यांनी पहिल्या फेरीचे तीन सामने खेळताना केवळ एकाच सामन्यात विजय मिळवला आहे. यामुळे वेस्ट इंडिजचा संघ टी20 विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच सुपर 12मध्ये पोहोचला नाही. त्यांच्या संघात अनुभवी खेळाडू नसल्याचा परिणाम स्पष्टपणे दिसला आहे. त्यातच स्फोटक फलंदाज शिमरन हेटमायर हा ऑस्ट्रेलियाचे विमान चुकवल्याने या स्पर्धेत खेळला नाही. यामुळेही वेस्ट इंडिजला त्याचे नुकसान झाले आहे. कारण नेहमीच चौकार-षटकारांचा पाऊस पाडत मोठी धावसंख्या उभारणारा हा संघ स्कॉटलंडविरुद्ध केवळ 118 धावसंख्येवरच सर्वबाद झाला. हा सामना स्कॉटलंडने 42 धावांनी जिंकला. तसेच हा वेस्ट इंडिजचा या स्पर्धेतील पहिलाच सामना होता.
Absolutely gutted..💔 pic.twitter.com/5NKTmJTwAK
— Windies Cricket (@windiescricket) October 21, 2022
या स्पर्धेत वेस्ट इंडिजचा एकमात्र विजय झिम्बाब्वे संघाविरुद्ध होता. हा सामना वेस्ट इंडिजने 31 धावांनी जिंकला होता. तिसऱ्या सामन्यात तर कहरच झाला त्यांना आयर्लंडने 9 विकेट्सने पराभूत करत त्यांच्या सुपर 12च्या आशेवर पाणी फेरले.
पहिल्या फेरीतच अशी स्थिती असताना सुपर 12च्या सामन्यांमध्ये कोणते चकित करणारे निकाल पाहायला मिळतील, हे उत्सुकतेचे ठरले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हर्षा भोगलेंनी निवडला टी-20 विश्वचषकातील सर्वकालीन सर्वोत्तम संघ, फक्त एका भारतीयाला दिलीये संधी
इंग्लंडच्या दिग्गजाने केले शिक्कामोर्तब! म्हणतोय, “केएल राहुल जगातील नंबर वन फलंदाज”