दिल्ली। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात ९ जूनपासून टी२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत ५ सामने होणार असून पहिला सामना दिल्लीमध्ये अरुण जेटली स्टेडियमवर आयोजित केला जाणार आहे. त्यामुळे सध्या दोन्ही संघ दिल्लीत सराव करत आहेत. पण, या दरम्यान दिल्लीतील तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षाही जास्त आहे. याबद्दल दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू तबरेज शम्सी याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शम्सीने दिल्लीतील तापमानाबद्दल (Delhi Temperature) एक ट्वीट केले आहे. त्याने मजेशीर अंदाजात ट्वीटमध्ये लिहिले की, ‘बाहेर तापमान केवळ ४२ डिग्री थंड आहे. बिल्कुल गरमी नाहीये.’ या ट्वीटवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. शम्सीने हे ट्वीट सराव करून परत हॉटलमध्ये येत असताना केले.
Just a cool 42 degrees outside 🤯
..not hot at all lol #Delhi #India
— Tabraiz Shamsi (@shamsi90) June 6, 2022
एका युजरने शम्सीच्या (Tabraiz Shamsi) ट्वीटला प्रतिक्रिया दिली की, ‘लाहोरमध्ये आत्ता ४३ डिग्री तापमान आहे.’ त्यावरही शम्सीने मजेशीर उत्तर दिले. त्याने लिहिले की ‘एवढ्या उष्णतेत लोक जिवंत कसे राहतात.’ याशिवायदेखील अनेक प्रतिक्रिया युजर्सनी दिल्या आहेत.
How do people survive in this heat 🙈
— Tabraiz Shamsi (@shamsi90) June 6, 2022
असा आहे दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा
दक्षिण आफ्रिका टी२० मालिकेसाठी (T20I Series) भारत दौऱ्यावर आला असून पहिला सामना दिल्लीत झाल्यानंतर दुसरा सामना १२ जूनला कटकला होणार आहे. त्यानंतर १४, १७ आणि १९ जून रोजी अनुक्रमे तिसरा, चौथा आणि पाचवा टी२० सामना विशाखापट्टणम, राजकोट आणि बंगळुरू येथे होणार आहे.
या मालिकेसाठी (India vs South Africa) दोन्ही संघांचे खेळाडू निवडण्यात आले आहेत. दरम्यान, या मालिकेसाठी भारताच्या रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह यासांरख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे या मालिकेदरम्यान अनेक युवा खेळाडू भारताकडून खेळताना दिसू शकतात.
असे आहेत दोन्ही संघ –
भारत – केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई , भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक
दक्षिण आफ्रिका – तेंबा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, एन्रीच नॉर्किया, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रस्सी वॅन डर ड्युसेन, मार्को यान्सेन.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘…म्हणून रोहित शर्मा उत्कृष्ट कर्णधार,’ बेबी एबीने गायले हिटमॅनचे गोडवे
‘हिटमॅनबाबत घेतलेला तो निर्णय बरोबरच’, प्रशिक्षक राहुल द्रविडचा रोहितला पाठींबा
उमरान मलिकला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळणार संधी? प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे महत्वाचे संकेत