भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये मानाची मानली जाणारी विजय हजारे ट्रॉफी सध्या खेळली जात आहे. सोमवारी (21 नोव्हेंबर) तामिळनाडू संघाने या सामन्यात वादळी फलंदाजीच्या जोरावर 500 पेक्षा मोठी धावसंख्या उभी केली. नारायण जगदीशन याने या सामन्यात 277 धावा केल्या आणि संघाला मोठा विजय देखील मिळवून दिला. लिस्ट ए क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय सोमवारी तामिळनाडू संघाच्या नावावर नोंदवला गेला.
बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियवर सोमवारी तामिळनाडू आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील रोमांचक लढत चाहत्यांना पाहायला मिळाली. नाणेफेक गमावल्यानंतर तामिळनाडू संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. पण नारायन जगदीशन आणि साई सुदर्शन यांनी अनुक्रमे 277 आणि 154 धावांची खेळी केली. सलामीवीर फलंदाजांच्या या वादळी फलंदाजीनंतर तामिळनाडू संघाने अवघ्या 2 विकेट्सच्या नुकसानावर 506 धावा केल्या. लिस्ट ए किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एखाद्या संघाने केलेली ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे.
प्रथम फलंदाजी करताना धावांचा मोठा डोंगर उभा केल्यानंतर तामिळनाडूचे गोलंदाज देखील कुठे कमी पडल्याचे पाहायला मिळाले नाही. 507 धावांचे लक्ष्य मिळाल्यानंतर अरुणाचल प्रदेश संघ जेव्हा फलंदाजीला आला, तेव्हा त्यांचे फलंदाज पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे विकेट्स गमावत गेले. अरुणाचल संघ अवघ्या 71 धावा करून 28.4 षटकांमध्ये सर्वबाद झाला. परिणामी त्यांना 435 धावांच्या मोठ्या अंतराने पराभव स्वीकारावा लागला. लिस्ट ए क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा पराभव ठरला आहे.
यापूर्वी समरसेट संघाच्या नावावर लिस्ट एक क्रिकेटमध्ये सर्वात मोठा विजय नोंद होता. त्यांनी 1990 मध्ये डिवॉन संघाविरुद्ध खेळताना 346 धावांनी विजय मिळवला होता. आता समरसेट संघ यादीत पहिल्या वरून दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. ताज्या आकडेवारीनुसार ग्लुसेस्टरशायर संघ यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. बकिंगहॅमरशायरविरुद्ध 2003 साली खेळलेल्या एका सामन्यात त्यांनी 324 धावांनी विजय मिळवला होता. यादीत चौथ्या क्रमांकावर झारखंड संघ आहे. झारखंडने 2021 मध्ये मध्ये प्रदेश संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या लिस्ट ए सामन्यात 324 धावांनी विजय मिळवला होता.
लिस्ट ए सामन्यांमधील सर्वात मोठे विजय
435 धावा – तामिळनाडू विरुद्ध अरुणाचलप्रदेश (2022)
346 धावा – समरसेट विरुद्ध डिवॉन (1990)
324 धावा – ग्लुसेस्टरशायर विरुद्ध बकिंगहॅमशायर (2003)
324 धावा – झारखंड विरुद्ध मध्य प्रदेश (2021)
(tamil-nadu-obtained-biggest-win-in-mens-list-a-cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंतची जागा घेण्यासाठी सज्ज झाला ‘हा’ यष्टीरक्षक, सलग 5 शतकांचा पाऊस पाडत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
दिग्गज ऑस्ट्रेलियन क्रिकेटर निवृत्त, भावनेच्या भरात केलेलं वक्तव्य वेधतंय लक्ष