गाैतम गंभीर जेव्हापासून भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे. तेव्हापासून संघामध्ये फलंदाज देखील गोलंदाजी करताना पहायला मिळत आहेत. गाैतम गंभीरचा जादू आता श्रेयस अय्यरवर देखील पाहयला मिळाले आहे. अय्यर मंगळवारी (27 ऑगस्ट) बुची बाबू स्पर्धामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. त्याने अष्टपैलू खेळाडू सुनिल नारायणच्या शैलीत गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. खरं तर सुनिल नारायण आयपीएल मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळतो. ज्याचा कर्णधार श्रेयस अय्यर आहे.
केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर बुची बाबू स्पर्धेत मुंबई संघाचा भाग आहे. मुंबईचे तामीळनाडू विरुद्ध सामना होत आहे. अय्यरने 27 ऑगस्ट रोजी सामन्याच्या पहिल्या दिवशी गोलंदाजी केली. सुनिल नारायणप्रमाणेच त्याने आधी चेंडू लपवला आणि नंतर फेकला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अय्यरला नारायणसारखी गोलंदाजी करताना पाहून क्रिकेट चाहत्यांना आनंद झाला. आता भारतीय संघातही नरिनची कमतरता भासणार नाही. असे चाहते कमेंट्स करत आहेत.
Shreyas Iyer bowling with Sunil Narine action. 😂 pic.twitter.com/EpX4ZxnfZx
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 27, 2024
या व्हिडओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “आता सुनील नारायण नाही, तर आम्हाला श्रेयस अय्यरची साथ द्यावी लागेल.” फलंदाजीबरोबरच भविष्यात अय्यरला फायदा होईल. आपल्या झंझावाती फलंदाजीशिवाय वेस्ट इंडिजचा क्रिकेटर नारायण त्याच्या धोकादायक फिरकी गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. केकेआरला आयपीएल 2024 जिंकण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
भारतीय संघ सध्या विश्रांतीवर (ब्रेकवर) आहे. अशा परिस्थितीत अनेक भारतीय खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळत आहेत. अय्यर लवकरच दुलीप ट्रॉफीमध्ये प्रवेश करणार आहे. श्रीलंका दौऱ्यात तो फ्लॉप ठरला होता. तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने केवळ 38 धावा केल्या होत्या. भारताला पुढील मालिका 19 सप्टेंबरपासून बांग्लादेशविरुद्ध खेळायची आहे.
हेही वाचा-
जय शाह आयसीसी अध्यक्ष बनले, आता बीसीसीआयचे सचिव कोण होणार? हे 3 नावं आघाडीवर
बिग बॅशमध्ये भारतीयांचे वर्चस्व; खेळाडूंच्या विक्रमाची नोंदी
कॅरेबियन संघाचा आफ्रिकेला दे धक्का! टी20 मालिकेत क्लीन स्वीप