भारतीय संघाने यावर्षी ऑस्ट्रेलियन संघाला ऑस्ट्रेलियात जाऊन पराभूत करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. ऍडलेड कसोटीत अवघ्या ३६ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर भारतीय संघाने पुनरागमन केले. मेलबर्न व ब्रिस्बेन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील भारतीय संघाने २-१ असा मालिका विजय मिळवला. आता या नामुष्कीजनक पराभवाचे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने चक्क कारण दिले आहे.
भारतीय संघाने लक्ष विचलित केले
ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा कर्णधार असलेला टिम पेन याने भारताकडून झालेल्या पराभवबद्दल बोलताना चक्क न पटण्यासारखे कारण दिले. पेन म्हणाला, “भारतीय संघाने आमचे लक्ष विचलित करून ठेवले. भारतीय संघ व्यवस्थापन म्हणाले होते की आम्ही ब्रिस्बेनमध्ये खेळणार नाही. त्यामुळे आम्हाला नक्की माहीत नव्हते की चौथा सामना कोठे होईल. भारतीय संघाबाबत खेळणे यामुळे आव्हानात्मक असते. ते नेहमी प्रतिस्पर्ध्यांना गाफील ठेवतात.”
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघ ब्रिस्बेन येथे होणारा चौथा सामना कोरोनामुळे इतरच खेळण्याबाबत आग्रही होता.
पेनने दिले निवृत्तीचे संकेत
स्टीव स्मिथवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर २०१८ मध्ये पेन ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केला गेला होता. त्यानंतर आता ३६ वर्षी पेनने निवृत्तीचे संकेत दिले आहेत. पेन म्हणाला, “ऑस्ट्रेलियन संघाने आगामी ऍशेसमध्ये इंग्लंडला पराभूत केल्यास मी निवृत्ती घेईल. तसेच, मला स्टीव स्मिथला पुन्हा एकदा असल्याचे नेतृत्व करताना पाहायला आवडेल. त्याला अगदी कमी वयात कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली होती. त्यानंतर तो प्रगल्भ होत राहिला.”
भारताने मिळवला होता मालिकाविजय
ऍडलेड येथील पहिल्या कसोटीत लाजीरवाणा पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघ आणि अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मेलबर्न येथील दुसऱ्या कसोटीत व ब्रिस्बेन येथील चौथ्या कसोटीत विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियात मालिका विजय मिळवला. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये कर्णधार टिम पेनला कर्णधार पदावरून हटविण्याची मागणी पुढे आली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
संवेदनशील ऑस्ट्रेलियन! ब्रेट ली आणि कमिन्ससह आणखी ११ खेळाडूंनी कोरोनाविरोधी लढाईसाठी केली मदत
ऑस्ट्रेलियन संस्कृतीतून ही गोष्ट शिकून द्रविडने भारतात खेळाडू घडवले, ग्रेग चॅपेल यांचे विधान
इंग्लंड दौरा या तीन खेळाडूंसाठी ठरू शकतो अखेरची संधी