भारतीय संघाचा 2020-21सालातील ऑस्ट्रेलिया दौरा यादगार ठरला होता. भारताने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. यापूर्वी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात वनडे आणि टी20 मालिकाही खेळली गेली होती. या दौऱ्यावर भारतीय संघाच्या आणखी एका पठ्ठ्याने तिन्ही क्रिकेट प्रकारात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. मात्र, हाच खेळाडू आता भारतीय संघात दिसेनासा झाला आहे. या खेळाडूला भारतीय संंघाकडून अखेरचा सामना खेळून 2 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.
भारतीय संघाच्या स्टार खेळाडूचे करिअर उद्ध्वस्त?
भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज टी नटराजन (T Natarajan) याने भारतीय संघासाठी खेळलेला अखेरचा सामना कदाचितच क्रिकेटप्रेमीला आठवत असेल. नटराजनने सन 2020मध्ये आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्याने तिन्ही क्रिकेट प्रकारात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच देशात पदार्पण केले होते. मात्र, नटराजन आता बऱ्याच काळापासून भारतीय संघात जागा बनवू शकला नाहीये. 32 वर्षीय नटराजन संघाच्या ताफ्यातही आपली जागी बनवण्यात अपयशी ठरत आहे.
पहिल्याच कसोटीत बनलेला हिरो
सन 2020-21च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिकेतील अखेरचा सामना जानेवारीमध्ये गाबा येथे खेळला गेला होता. या सामन्यात नटराजनने पदार्पण केले होते. नटराजनने सामन्याच्या पहिल्याच डावात 24.2 षटके गोलंदाजी करत 3 विकेट्स घेतल्या होत्या. हा सामना भारताने 3 विकेट्सने जिंकला होता. मात्र, या सामन्यानंतर नटराजन भारताच्या कसोटी संघात आपली जागा बनवू शकला नाहीये. त्याने अखेरचा वनडे आणि टी20 सामना मार्च 2021मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता.
नटराजनच्या नशिबी फक्त 7 आंतरराष्ट्रीय सामने
नटराजनने भारतासाठी 1 कसोटी सामना, 4 आंतरराष्ट्रीय टी20 सामने आणि 2 वनडे सामने खेळले आहेत. नटराजनच्या नावावर कसोटीत 3 विकेट्स, टी20त 7 विकेट्स आणि वनडेत 3 विकेट्सचा समावेश आहे. नटराजनला कारकीर्दीच्या सुरुवातीला भारताचा ‘यॉर्कर मॅन’ म्हणून ओळखले जाऊ लागले होते. मात्र, आता त्याला संघातही जागा मिळत नाहीये. (team india star bowler played his last international match in march 2021 who is he know here)
हेही वाचा-
जरा इकडे पाहा! भारताच्या माजी प्रशिक्षकाने वर्ल्डकपसाठी निवडला अंतिम संघ, ‘या’ 2 शिलेदारांना दिला डच्चू
‘आज माझी आई…’, अफगाणिस्तानविरुद्ध मॅचविनर ठरलेला नसीम शाह भावूक- व्हिडिओ