भारताचा माजी क्रिकेटपटू दीप दासगुप्ता यांनी 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाच्या जबरदस्त कामगिरीबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, भारतीय संघ इतका जबरदस्त खेळ दाखवू शकते की अपयशाची भीती खेळाडूंपासून दूर झाली आहे. दीप दासगुप्ताच्या म्हणण्यानुसार, रोहित शर्माने आतापर्यंत ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे, ते पाहता खेळाडूंवर कोणतेही दडपण नसल्याचे दिसते.
दीप दासगुप्ताच्या मते, रोहित शर्माच्या आक्रमक फलंदाजीने खेळाडूंवरील सर्व दडपण दूर केले आहे. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना तो म्हणाला, “भारतीय संघ न घाबरता खेळत आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो की, स्पर्धेपूर्वी मी भारतीय संघ फेव्हरेट असल्याचे सांगितले होते, परंतु माझी चिंता फक्त अशी होती की, खेळाडूंना अपयशाची भीती असू शकते. मी धावा केल्या नाहीत तर काय होईल, असा विचार खेळाडूंनी करू नये? ही गोष्ट आपण टी-20 विश्वचषकादरम्यान पाहिली. ही भीती आपण यापूर्वी पाहिली आहे. मात्र, रोहित शर्माने ज्या पद्धतीने कर्णधारपद भूषवले आहे आणि ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे, त्यामुळे ती गोष्ट संघाबाहेर गेली आहे. निदान मला तरी तसं वाटतंय. खेळाडू आता मैदानावर व्यक्त होत आहेत. भविष्यात भारताने एकही सामना गमावला तरी त्यांच्या खेळण्याच्या पद्धतीत बदल होणार नाही.”
भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर या संघाने आतापर्यंत तीन सामने जिंकले आहेत. कर्णधार रोहित शर्माने या सामन्यांमध्ये मोठे योगदान दिले आहे. पहिल्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता पण त्यानंतर त्याने अफगाणिस्तानविरुद्ध जबरदस्त शतक झळकावले आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही त्याने उत्कृष्ट खेळी खेळली.
Team India World Cup because Rohit Sharma ex-cricketer targeted reaction
हेही वाचा-
नाद केला पण पुरा केला! न्यूझीलंडच्या पठ्ठ्यानं गाजवलं 2023 वर्ष, वनडेत ठोकल्या ‘एवढ्या’ धावा
हेही वाचा-
BREAKING: रोहित शर्मावर ट्रॅफिक पोलिसांची मोठी कारवाई, मुंबई-पुणे हायवेवर हिटमॅनच्या लॅम्बोर्गिनीचा थरार