इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघातील ३ सामन्यांच्या टी२० मालिकेचा काल (१ सप्टेंबर) शेवटचा निकाल लागला. मॅंचेस्टर येथे पार पडलेल्या टी२० मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडला ५ धावांनी पराभूत केले आणि मालिका १-१च्या बरोबरीवर संपली. Pakistan Won Third T20 Match Against England By 5 Runs
इमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मैदानावर पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानने २० षटकात ४ विकेट्स गमावत १९० धावा केल्या. यात पाकिस्तानच्या मोहम्मद हाफिज याच्या नाबाद ८६ धावांचा समावेश होता. हे हाफिजच्या टी२० कारकिर्दीतील १३वे अर्धशतक होते. तसेच, हैदर अलीनेही या सामन्यात ५४ धावांची शानदार खेळी केली. यासह १९ वर्षीय हैदर त्याच्या टी२० पदार्पणाच्या सामन्यातच अर्धशतक ठोकणारा पाकिस्तानचा पहिला फलंदाज ठरला आहे.
तर, इंग्लंड पाकिस्तानच्या १९१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना २० षटकात ८ विकेट्स गमावत १८५ धावाच करु शकला. इंग्लंडचा फलंदाज मोईन अलीने ६१ धावा आणि टॉम बँटनने ४६ धावांची दमदार खेळी केली होती. तरीही, इंग्लंडला केवळ ५ धावांनी तिसरा टी२० सामना गमवावा लागला. पाकिस्तानचे गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि वहाब रियाज यांनी प्रत्येकी २ फलंदाजांना बाद केले. तर, इमाद वसिम आणि हॅरिस राऊफ यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
या सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद हाफिज हा सामनावीर ठरला. तसेच दूसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यातील त्याच्या दमदार खेळीमुळे त्याला मालिकावीर पुरस्कारदेखील देण्यात आला.
इंग्लंड संघ २ वर्षांनंतर कोणत्या टी२० मालिकेत पराभूत झाला आहे. यापुर्वी त्यांनी जुलै २०१८मधील टी२० मालिका गमावली होती. त्या मालिकेत भारताने इंग्लंडला २-१च्या फरकाने पराभूत केले होते. त्या मालिकेनंतर इंग्लंडने सलग ५ टी२० मालिका जिंकल्या. अशाप्रकारे इंग्लंड संघ सलग ६वी टी२० मालिका जिंकण्यापासून मुकला.
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात पहिल्यांदा ३ सामन्यांची टी२० मालिका खेळली गेली आहे. यापुर्वी २०१०मध्ये दोन्ही संघात २ सामन्यांची टी२० मालिका खेळली गेली होती. या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा व्हाईटवॉश केला होता. पण, यंदाची टी२० मालिका बरोबरीत सुटली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बड्डे बाॅय इशांत: ट्रोल तर कराच पण कौतूकाची थापही जरूर द्या!
ऑस्ट्रेलियन दिग्गजाची भविष्यवाणी, पॉइंट्स टेबलमध्ये या क्रमांकावर असणार मुंबई इंडियन्स
क्वारंटाईनमध्ये असलेल्या दीपक चाहरने शेअर केला व्हिडिओ म्हणाला, मी आता…
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष: वेगवान गोलंदाज इशांत शर्माबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी
जर ही गोष्ट घडली नसती तर अँडरसनच्या आधीच ‘या’ ३ वेगवान गोलंदाजांनी घेतल्या असत्या कसोटीत ६०० विकेट्स