मागील काही दिवसांपासून भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी जोर धरला आहे. मात्र, आता सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाच्या बातम्यांसोबतच त्यांचा ‘द मिर्झा मलिक शो‘ रियॅलिटी शोदेखील भलताच चर्चेत आहे. सध्या दोघांकडून घटस्फोटाबद्दल अधिकृत वक्तव्य समोर आले नाहीये. मात्र, शोएब मलिकने यावर मौन तोडले आहे.
काय म्हणाला शोएब मलिक?
पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) याने माध्यमांशी बोलताना म्हटले की, हा त्यांचा खासगी विषय आहे. तसेच, हा विषय त्यांच्यावरच सोडला पाहिजे. शोएबने या वक्तव्यावरून सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, संपूर्ण प्रकरणात माध्यमांनी दखल घेणे त्यांना आवडत नाहीये. शोएबने असेही म्हटले आहे की, सानियापासून वेगळे होण्याबाबत तो कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देणार नाही. माध्यमांतील वृत्तांनुसार, शोएब मलिक आणि सानिया मिर्झा (Shoaib Malik And Sania Mirza) या दोघांनीही वेगवेगळ्या शोसोबत करार केल्यामुळे आणि कायदेशीर कचाट्यांमुळे घटस्फोटाबद्दल अधिकृत वक्तव्य करत नाहीयेत.
खरं तर, शोएबने मागील वर्षी आयेशा उमर हिच्यासोबत बोल्ड फोटोशूट केले होते. त्या फोटोशूटनंतर आयेशाचे नाव शोएबसोबत जोडले जात आहे. त्याने फोटोशूटबद्दल म्हटले होते की, “क्रिकेटपटू असल्यामुळे मला मॉडेलिंगची समज नव्हती. मात्र, या क्षेत्रात आयेशाने खूप मदत केली होती.”
सानिया मिर्झा (Sania Mirza) हिने मागील महिन्यात इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. त्यावरून घटस्फोटांच्या बातम्यांना खतपाणी मिळाले. मागील महिन्यात सानियाने मुलगा इजहानसोबत एक फोटो शेअर केला होता. त्यासोबत तिने लिहिले होते की, “तो क्षण, जो मला सर्वात कठीण दिवसात घेऊन जातो.” सानियाने एक स्टोरीही शेअर करत लिहिले होते की, “तुटलेले हृदय कुठे जाईल, तो परमेश्वराकडे जाईल.”
View this post on Instagram
सन 2010मध्ये झाले होते लग्न
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी पाच महिने डेटिंग केल्यानंतर सन 2010मध्ये संसार थाटला होता. या जोडप्याने 30 ऑक्टोबर, 2018मध्ये मुलगा इजहान मिर्झा मलिक (Izhaan Mirza Malik) याचे जगात स्वागत केले होते. (Tennis Player sania mirza and shoaib malik pak cricketer statement on divorce personal matter)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तुम्ही या विजयाचे खरे हक्कदार आमदार जी’, पत्नीच्या विजयावर जडेजाकडून स्तुतीसुमने; पाहा ट्वीट
व्हिडिओ: ‘म्हातारा’ म्हणणाऱ्या कर्णधार बाबरला शादाब खानचे सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाला, ‘आता आम्ही’