fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

बीसीसीआयचं अध्यक्षपद कायम रहावं म्हणून गांगुलीसाठी या व्यक्तीने लावली फिल्डींग

बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला जुलै महिन्यापासून सुरु होणाऱ्या ३ वर्षांच्या कुलिंग ऑफ पिरीयडमधून (या काळात क्रिकेट संघटनांच्या कोणत्याही पदावर काम करता येत नाही) सूट मिळावी, अशी याचिका आयपीएल २०१३मधील स्पॉट फिक्सिंग याचिकाकर्ते आदित्य वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे.

सोमवारी वर्मा म्हणाले की, “माझ्या याचिकेमुळे बीसीसीआयच्या (BCCI) घटनेतसुद्धा सुधारणा करावी लागली. गांगुली आणि त्याच्या संघाला ३ वर्षांची मुदत दिली जावी, अशी याचिका मी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.”

न्यायमूर्ती आरएम लोढा समितीच्या (RM Lodha committee) सुधारणेनुसार तयार करण्यात आलेल्या बीसीसीआयच्या नव्या घटनेत, कोणत्याही व्यक्तीने राज्य असोसिएशनबरोबरच बीसीसीआयचा अधिकारी म्हणून सलग सहा वर्षे काम केले असेल. तर त्याला ३ वर्षांच्या कूलिंग ऑफ पिरीयडमधून जाणे आवश्यक आहे.

यापूर्वी गांगुली बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या (Bengal Cricket Association) मुख्य सचिव या पदानंतर बीसीसीआयचा अध्यक्ष बनला आहे. त्याने ऑक्टोबरमध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष पद भूषविले होते. त्यामुळे त्याचा कार्यकाळ फक्त ९ महिन्यांचा राहणार आहे. त्यामुळे जुलै महिन्यात गांगुलीला पायउतार व्हायला लागू शकते.

हीच परिस्थिती बीसीसीआयचा सचिव जय शाहचीही आहे. शाहने ५ वर्षे गुजरात क्रिकेट असोसिएशनचे (Gujrat Cricket Association) सचिवपद सांभाळले होते. त्यामुळे त्यालाही आता कूलिंग ऑफ पिरीयडमधून (Cooling of Period) जाणे आवश्यक आहे.

वर्मा यांना विचारण्यात आले की, तो आणखी एक याचिका का दाखल करू इच्छितो? यावेळी वर्मा  म्हणाला की, “माझा उद्देश हा बीसीसीआयच्या पारदर्शक कामाची खात्री करुन घेण्याचा होता. जर गांगुलीसारखा व्यक्ती आपला कार्यकाळ पूर्ण करू शकत नसेल तर मग उपयोग काय?”

“प्रशासकांच्या समितीने ३ वर्षांपर्यंत बीसीसीआयचे कामकाज चूकीच्या पद्धतीने सांभाळले. पद सांभाळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कामाचे व्यवस्थापन करण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे गांगुली आणि त्याच्या टीमला मुदत देण्यात आली पाहिजे,” असेही वर्मा यावेळी म्हणाले.

ट्रेंडिंग घडामोडी-

४ मराठमोळे खेळाडू ज्यांनी केल्या आहेत क्रिकेटमध्ये १०हजारपेक्षा जास्त धावा

तर आयपीएलचे सर्व सामने महाराष्ट्रातील या ४ स्टेडियमवर होणार

-रोहित-विराटमध्ये हा होणार हर्षल गिब्जचा क्वॉरंटाईन पार्टनर

-२००३ला याच दिवशी टीम इंडियाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावुन घेतला गेला

-या ५ खेळाडूंना आहे वनडेत १० हजार धावा करण्याची संधी, एक नाव आहे भारतीय

त्या १४ धावा अशा होत्या की सचिनने लगेच उंचावली होती बॅट

You might also like