यंदाची आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळली जात आहे. दरम्यान या मेगा स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) संघ (23 फेब्रुवारी) रोजी आमने-सामने असणार आहेत. तत्पूर्वी बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने शानदार कामगिरी 6 गडी राखून विजय मिळवला. पण पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारतासाठी टॉस जिंकणे खूप महत्वाचे असेल, त्यामागील कारण आपण या बातमीद्वारे जाणून घेऊया.
दुबईमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यांच्या रेकॉर्डवर नजर टाकली तर असे दिसून येते की येथे टाॅस जिंकल्यानंतर, जो संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतो, तो अर्धा सामना जिंकतो. म्हणूनच या मैदानावर टाॅसला इतके महत्त्व दिले जाते.
दुबईमध्ये आतापर्यंत 59 वनडे सामने खेळले गेले आहेत आणि या काळात लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने 35 सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, प्रथम फलंदाजी करणारा संघ फक्त 22 सामने जिंकू शकला आहे. या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी 219 धावा आहेत. बहुतेक कर्णधार या खेळपट्टीवर टाॅस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करणे पसंत करतात, कारण दुसऱ्या डावात येथे फलंदाजी करणे सोपे आहे.
पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून 60 धावांनी दारुण पराभव पत्करावा लागल्याने भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान संघावर खूप दबाव असेल. जर पाकिस्तान भारतीय संघाकडून एका धावेने पराभूत झाला तर 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील त्यांचा प्रवास जवळजवळ संपुष्टात येईल. अशाप्रकारे, भारताविरुद्धचा सामना पाकिस्तानसाठी ‘करो या मरो’ असणार आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी दोन्ही संघ-
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद. शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती
पाकिस्तान- मोहम्मद रिझवान (कर्णधार), बाबर आझम, इमाम-उल-हक, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अश्रफ, खुशदिल शाह, सलमान अली आगा, उस्मान खान, अबरार अहमद, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानचा पराभव आणि दिग्गजाचा संताप! खेळाडूंना झणझणीत सुनावणी
भारतीय संघाचा दबदबा कायम! गुणतालिकेतील नवीन समीकरणे जाणून घ्या
शिखर धवनला मिळाली नवी जीवनसाथी? सोशल मीडियावर चर्चांना उधाण






