आयपीएलच्या १३ व्या हंगामाला आजपासून(१९ सप्टेंबर) सुरुवात होत आहे. यावेळी आयपीएलचा हंगाम युएईमध्ये होणार आहे. भारतात कोरोना व्हायरसची वाढती प्रकरणे लक्षात घेता हा आयपीएल हंगाम भारताबाहेर हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यावेळी सर्व ८ संघ युएईला आयपीएल सुरु होण्याच्या जवळपास ३० दिवस आधीच दाखल झाले. यावेळी सर्व संघांनी कसून सराव केला आहे.
प्रत्येक संघ मजबूत दिसून येत आहे. प्रत्येक संघाने या आयपीएलआधी प्रत्येक क्षेत्रात मजबूत राहण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू असे असले तरी प्रत्येक संघात एकतरी कमतरता आहे. त्याच एका कमतरतेचा आढावा घेण्यात आला आहे. या लेखात आपण प्रत्येक संघातील एका कमतरतेबद्दल जाणून घेऊ.
८ आयपीएल संघांमध्ये एक एक तरी कमतरता आहेच, पहा कुणाकडे काय नाही –
कोलकाता नाईट रायडर्स – २ वेळा आयपीएल जिंकलेल्या या संघात एकही डावखुरा वेगवान गोलंदाज नाही.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – विराट कोहली कर्णधार असलेल्या या संघात वेस्ट इंडिजचा एकही खेळाडू नाही.
दिल्ली कॅपिटल्स – युवा खेळाडूंसाठी ओळखला गेलेल्या या संघात एकही परदेशी सलामीवीर फलंदाज नाही.
मुंबई इंडियन्स – आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असणाऱ्या मुंबई इंडियन्स संघात एकही इंग्लंडचा क्रिकेटपटू नाही.
सनरायझर्स हैद्राबाद – २०१६ ला आयपीएलविजेतेपद मिळवणाऱ्या या संघात केवळ २ परदेशी वेगवान गोलंदाज आहेत.
किंग्स इलेव्हान पंजाब – आयपीएलमधील हा असा संघ आहे ज्यांच्याकडे ऑस्ट्रेलियन गोलंदाज नाही.
चेन्नई सुपर किंग्स – ३ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकलेल्या या चेन्नई सुपर किंग्स संघात मुख्य ऑफ स्पिनर नाही तसेच परदेशी यष्टीरक्षकही नाही.
ट्रेंडिंग लेख –
युवराजशी फ्लिंटॉफने पंगा घेतला, पण ब्रॉडने किंमत चुकवली
‘उजव्या हाताचा रिषभ पंत’ अशी ओळख असलेला मोहरा आयपीएल गाजवणार
“नवा बोथम” म्हणून नावाजल्या गेलेल्या डॅरेन गॉफ विषयी १० रंजक गोष्टी
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्यात आज होऊ शकतात हे ५ विक्रम
काय सांगता! आजपर्यंत आयपीएलमध्ये विराट कोहलीला ‘हा’ गोलंदाज एकदाही करु शकला नाही बाद
इकडे बाकी खेळाडू आयपीएलच्या मागे लागलेत तर तिकडे रैनाने मात्र…