तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 2019च्या वनडे विश्वचषकापूर्वी चायनामन गोलंदाज कुलदीप यादव हा भारतीय संघासाठी ट्रंप कार्ड मानला जात होता. मात्र, त्याच्या प्रदर्शनामुळे त्याला थेट संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. असे असले, तरीही कुलदीपने पुन्हा एकदा संघाचे दार ठोठावले आहे. तो भारतीय संघात परतला आहे. तसेच, त्याला मिळालेल्या प्रत्येक संधीचे त्याने सोने करून दाखवले आहे. इतकेच नाही, तर त्याने फक्त गोलंदाजीतूनच नाही, तर फलंदाजीतूनही मोलाचे योगदान दिले आहे. आजच्या या लेखातून आपण ते तीन कारणे जाणून घेऊया, ज्यामुळे कदाचित प्रत्येक क्रिकेटप्रेमी म्हणेल की, कुलदीप यादव विश्वचषक 2023 स्पर्धेत खेळलाच पाहिजे. तसेच, रोहित शर्मा हादेखील प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करण्यासाठी आतुर असेल.
कोणती आहेत ती तीन कारणे?
1. नवीन कुलदीप यादव
कुलदीप यादव (Kuldeep Yadav) हा 2022मध्ये चांगलाच लयीत असल्याचे दिसत आहे. ही भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आहे. 2021मध्ये गुडघ्याची सर्जरी झाल्यानंतर, त्याने दुसऱ्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. नेट्समध्ये फलंदाजी करताना त्याच्या हाताला दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला संघाबाहेर पडावे लागले होते. जूनमध्ये देशांतर्गत स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिकेत त्याचे पुनरागमन झाले होते. पुनरागमनानंतर त्याने जेवढे सामने खेळले, त्यात सामान्यत: चांगले प्रदर्शन केले आहे. कुलदीपने सन 2022मध्ये खेळलेल्या 8 वनडे सामन्यात 27.75च्या सरासरीने 12 विकेट्स घेतल्या आहेत. इतकेच नाही, तर बांगलादेशविरुद्धच्या चालू कसोटी सामन्यातही त्याने बॅटमधून शानदार कामिगरी केली. त्याने 114 चेंडूत 40 धावांची खेळी केली. अशात जर तो असे प्रदर्शन करू शकतो, तर रोहित शर्मासाठी तो चांगला खेळाडू ठरू शकतो.
2. कुलदीप यादव विकेट घेणारा खेळाडू
कुलदीप यादव 28 वर्षांचा असून त्याने आतापर्यंत 73 वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 5.20 च्या इकॉनॉमी रेटने 119 विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याने 25 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 6.89च्या इकॉनॉमी रेटने 44 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. हे आकडे पाहिल्यानंतर समजते की, कुलदीप हा एक विकेट घेणारा खेळाडू आहे. तसेच, कर्णधार आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अशा खेळाडूला सामील करण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो.
3. कुलदीपकडे भिन्नता
भारतीय संघाकडे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये वेगवेगळे फिरकीपटू आहेत. मात्र, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांच्याशी तुलना केली, तर समजते की, कुलदीपकडे सर्वाधिक भिन्नता आहे. कुलदीप डावखुऱ्या हाताचा फिरकीपटू आहे, पण तो इतरांच्या तुलनेत वेगवेगळ्या पद्धतीने गोलंदाजी करतो. इतकेच नाही, तर खेळपट्टीमधून मदत मिळत नसेल, तेव्हा तो आपल्या गतीमध्ये बदल करून फलंदाजांना चकवण्याची क्षमता राखतो.
आगामी वनडे विश्वचषक 2023 भारतात होणार आहे आणि भारतातील खेळपट्टीवर कुलदीपच्या फिरकीची जादू कमाल दाखवते. अशात वनडे विश्वचषकात कुलदीप भारतीय संघासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. (these 3 reasons why kuldeep yadav should play in upcoming odi world cup in india lets know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! भारतीय दिग्गजाने ‘या’ क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा दिला राजीनामा, बोर्डाने दिली माहिती
‘तुझी बहीण असल्याचा मला…’, अर्जुन तेंडुलकरच्या शतकानंतर साराची लक्षवेधी पोस्ट; एकदा पाहाच