जानेवारी २०२०मध्ये बीसीसीआयने खेळाडूंच्या वार्षिक मानधन कराराची यादी जाहीर केली. या यादीत भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे धोनीच्या अनेक चाहत्यांनी बीसीसीआयवर टीका केली होती.
पण जरी धोनीला बीसीसीआयने मानधन करारातून वगळले असले तरी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या धोनीकडे उत्पन्नाचे अनेक स्त्रोत आहेत. 2019 वर्षात फोर्ब्स मासिकाच्या आकडेवारीनुसार धोनीची 136 कोटी रुपये एवढी वार्षिक कमाई आहे.
कमाई करण्यासाठी धोनीकडे उपलब्ध असलेले काही स्त्रोत –
व्यावसायिक जाहिराती –
धोनी जवळजवळ 6 महिन्यांपासून क्रिकेट खेळलेला नसला तरी अजूनही त्याची लोकप्रियता कमी झालेली नसल्याचे अनेकदा दिसून येते. त्याचमुळे धोनी हा एक ब्रँड झाल्याचेही लक्षात येते. हाच विचार करता पुढील काही वर्षे तरी तो अनेक व्यावसायिक जाहिरांतीमध्ये दिसू शकतो.
सेव्हन ब्रँड –
सेव्हन या भारतीय लाईफस्टाईल ब्रँडचा धोनी ब्रँड अँबेसिडर आहे. हा ब्रँड स्पोर्ट्सवेअर कपडे, शुज (फुटवेअर)चा उत्पादक आणि विक्रेता आहे. तसेच धोनीने सेव्हन कंपनीतील फुटवेअर ब्रँच विकतही घेतली आहे.
Seven Store Now Open In Ghaziahad.
Grab Your Favourite Seven Merchandise at G3. DMall, Shakti khand, Indirapuram, Ghaziabad.#IAMSEVEN #SEVEN
@DREAMSportsINDIA pic.twitter.com/52z6GVftX3— Seven (@TheSevenLife_) January 27, 2019
चेन्नईन एफसीचा सहमालक –
इंडियन सुपर लीग या भारतीय फुटबॉल लीगमधील चेन्नईन एफसी या संघाचा धोनी सहसंघमालक आहे. तो अनेकदा चेन्नईच्या सामन्यांना उपस्थित देखील असतो. धोनी मागील अनेक वर्षे आयपीलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत असल्याने त्याचे चेन्नई शहराशी वेगळे नाते जोडले गेले आहे.
Another feather in MS Dhoni's illustrious cap as he is conferred with the honourable #PadmaBhushan Award!
Congratulations to namma co-owner, who continues to be an inspiration for one and all! pic.twitter.com/jlKfm0VpEE
— Chennaiyin F.C. (@ChennaiyinFC) January 26, 2018
माही रेसिंग टीम इंडिया –
धोनीचे बाईक प्रेम सर्वश्रूत आहे. विशेष म्हणजे सुपरस्पोर्ट्स वर्ल्ड चॅम्पियनशीपमधील माही रेसिंग टीम इंडिया संघाचा धोनी सहसंघमालक आहे. या संघाचा दुसरा सहसंघमालक अक्किनेनी नागार्जून आहे.
रांची रेज –
धोनीने केवळ फुटबॉल आणि बाईक रेसिंग संघांमध्येच गुंतवणूक केली असे नाही तर त्याच्याकडे हॉकी इंडिया लीगमध्येही रांची रेज या संघाची मालकी देखील आहे. धोनी झारखंडमधील रांची शहरातील रहिवासी असून हा संघ रांची शहराचे प्रतिनिधित्व करतो.
हॉटेल माही रेसिडेन्सी –
रांचीमध्ये धोनीच्या मालिकीचे एक हॉटेल असून त्याचे नाव हॉटेल माही रेसिडेन्सी असे आहे. रांचीमध्ये पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांसाठी या हॉटेलमध्ये कमी खर्चात खोल्या रहायला मिळतात.
स्पोर्ट्सफिट –
भारतातील सर्वात फिट असणाऱ्या खेळाडूंपैकी असलेला धोनी स्पोर्ट्सफिट वर्ल्ड नावाच्या जीम फ्रँचायझीचा मालक आहे. या जीमच्या तब्बल 200 ब्रँचेस भारतभर आहेत.
ट्रेडिंग बातम्या-
क्रिकेटची खेळपट्टी ते राजकारणाचा फड गाजवलेल्या खेळाडूंची ड्रीम ११
२००१ ते २०१० या काळात सर्वाधिक धावा करणारे ५ खेळाडू, सचिन आहे चक्क…
तुम्हाला सांगू शकत नाही अशा गोष्टी आम्हाला विराट बोलायचा