सध्या भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघात एकमेव कसोटी सामना खेळला गेला होता. त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका पार पडली. यामध्ये इंग्लंड संघाने भारतीय संघाला 2-1 ने पराभूत केले. या एकदिवसीय मालिकेनंतर भारत आणि इंग्लंडमध्ये 9 जुलैपासून तीन टी20 सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे.
भारत आणि इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या टी 20 मालिकेसाठी इंग्लंड संघात आक्रमक फलंदाज डॅनी वॅट आणि मॅडी विलियर्स यांचे पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर इंग्लंड संघातील केट क्रॉस आणि लॉरेन विनफिल्ड हिल आपल्या प्रादेशिक संघाकडून खेळण्यासाठी परत जाणार आहेत. याच आठवड्यांमध्ये चार्लोट एडवर्ड्स कपसाठी त्या दोन्ही खेळाडू उपलब्ध राहणार आहेत. टी20 मालिकेसाठी इंग्लंड संघाचे कर्णधारपद हीथर नाईटकडे कायम आहे.
इंग्लंड संघाचा मुख्य प्रशिक्षक लीसा नाईटले यांनी सांगितले की, ‘आम्ही आंतरराष्ट्रीय कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे आणि आता आम्ही आंतरराष्ट्रीय टी20 मालिकेसाठी मजबूत संघ निवडत आहोत. विजय मिळविण्यासाठी आम्ही खूप कष्ट घेऊ. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात संघाकडून खराब कामगिरी झाली. त्यामुळे पराभवाचा सामना करावा लागला. यामुळेच आम्ही पहिल्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विरुद्ध संघाला विजयी होण्याची कोणतीही संधी देणार नाही.’
या टी20 मालिकेतील पहिला सामना 9 जुलै रोजी नॉर्थम्पटन येथे खेळला जाणार आहे. तर दुसरा टी20 सामना 11 जुलैला होणार आहे आणि तिसरा आणि शेवटचा सामना 14 जुलैला चेम्सफोर्डमध्ये खेळला जाणार आहे.
टी20 मालिकेसाठीचा इंग्लंड संघ
हीथर नाइट (कर्णधार), टॅमी ब्युमोंट, कॅथरीन ब्रंट, फ्रेया डेविस, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, टॅश फरांट, सारा ग्लेन, एमी जोन्स, नताली स्कायव्हर, आन्या श्रबसोल, मॅडी विलियर्स, फ्रेन विल्सन आणि डॅनी वॅट.
महत्त्वाच्या बातम्या –
जून महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकनं जाहीर, भारताच्या ‘या’ २ खेळाडूंचा समावेश
‘कॅप्टनकूल’ धोनीने सावरली या ५ खेळाडूंची कारकिर्द, नाहीतर अवघड होते…
शुबमन गिलला बीसीसीआयने इंग्लंडमधून बोलवले परत; मात्र, बदली खेळाडूचा प्रश्न कायम