Loading...

भारत-विंडीज मालिकेसाठी नो बॉल बाबत झाला हा मोठा निर्णय…

भारत आणि वेस्ट इंडीज संघात शुकवारपासून 3 सामन्यांची टी20 मालिका सूरू होणार आहे. त्यानंतर 15 डिसेंबरपासून या दोन संघात 3 सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. या मालिकेदरम्यान एक मोठा बदल बघायला मिळणार आहे.

Loading...

दोन्ही संघामंधील टी20 आणि वनडे मालिकांमध्ये फ्रंट फुट नो बॉलचा निर्णय मैदानावरील पंचाऐवजी तिसरा पंच घेईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसीने गुरूवारी ही घोषणा केली आहे. हा नियम चाचणी पुरता म्हणून लागू करण्यात येईल.

आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “संपूर्ण चाचणी दरम्यान, तिसरा पंच   गोलंदाजाच्या प्रत्येक चेंडूवर नजर ठेवण्याची आणि गोलंदाजाचा पाय कुठे पडत आहे, याची नोंद ठेवण्यास जबाबदार असेल.

आयसीसीच्या म्हणण्यानुसार गोलंदाजाने जर नो बॉल टाकला तर तिसरा पंच मैदानावरील पंचाशी बोलेल, नंतर नो बाॅल देण्यात येईल. आयसीसीने म्हटले आहे की जर नोबॉलची अचूकता  लक्षात आली नाही तर (क्लोज कॉल असेल तर) या संशयाचा फायदा गोलंदाजाला होईल.

Loading...

आयसीसीने पुढे म्हटले आहे की, ‘जर हा निर्णय पास होण्यास विलंब झाला तर मैदानावरील पंच बाद झाल्याचा निर्णय बदलू शकेल (जर फलंदाजाला बाद दिला असेल तर) आणि नो बॉल देण्यात येईल . बाकी पूर्वीप्रमाणेच इतर सर्व निर्णयांसाठी मैदानावरील पंच जबाबदार असेल.

आयसीसीने म्हटले आहे की, ‘नो-बॉलची अचूकता तपासण्यासाठी या चाचणीचा वापर करण्यात येईल. तसेच खेळाच्या वेगावर याचा कोणताही नकारात्मक प्रभाव पडतो की नाही, हे देखील पाहिले जाईल.’

Loading...

You might also like
Loading...