सध्या कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे अनेक गोष्टींवर त्याचा परिणाम होत आहे. अनेक क्रीडास्पर्धाही रद्द करण्यात आल्या आहेत. पण यातून काहीतरी शिकवण मिळेल आणि लोक भविष्यात सतर्क रहाण्यास शिकतील, असे भारताचा फिरकीपटू आर अश्विनने म्हटले आहे.
क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार अश्विन म्हणाला, ‘ही वेळ कोणत्याही देशाला जबाबदार ठरवण्याची नाही तर या संकटावर उपाय शोधण्याची आहे. सध्या एकमेकांपासून अंतर राखणे हाच आता सर्वात चांगला उपाय आहे. आशा आहे की शास्त्रज्ञ लवकरच यावर तोडगा काढतील. हा सर्वांसाठी धडा आहे. आम्ही खेळाला खूप गंभीरतेने घेतो. पण खेळामुळे काही गोष्टींमध्ये आडथळा येऊ शकतो.’
अश्विन पुढे म्हणाला, ‘खूप वेळ असूनही मी क्रिकेटचा फारसा विचार केला नाही. सध्या टीव्हीवर जुने क्रिकेट सामने पाहण्याची इच्छा नाही आणि मला माहित नाही का पण यूट्यूबवर जुन्या व्हिडिओदेखील पहात नाही.’
तो म्हणाला, ‘मी क्रिकेटचा फारसा विचार सध्या करत नाही. आपण काही उद्देशाने काहीतरी करतो. जसे मी सराव करायला गेलो तर मला माहित असते की आयपीएल किंवा इतर कोणते तरी सामने आहेत. पण जर मी सरावाला जाणार आणि मी कशासाठी सराव करतो हे मला माहित नाही, तर त्याचा काही उपयोग नाही.’
सध्या कुटुंबासमवेत घरी असलेला ३३ वर्षीय अश्विन म्हणाला, ‘आता मी दररोज मुलींसमवेत एक नवीन दिनचर्येसह उठत आहे. जेव्हा मी साडेपाच किंवा सहा वाजण्याच्या सुमारास उठतो तेव्हा माझी लहान मुलगी जवळजवळ जागी झालेली असते. आम्ही दोघे एकत्र ब्रश करतो, ग्रीन टी पितो आणि नंतर स्पीकर उचलतो आणि जिम आणि सेंद्रिय बागेत फिरतो. मी तिथे कसरत करतो आणि माझी मुलगी गाणी ऐकते.’
त्याचबरोबर कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावाबद्दल अश्विन म्हणाला, ‘मला आठवत नाही मी शेवटचे माझ्या शहरात चिमण्यांचा आवाज कधी ऐकला होता. मला वाटत आहे की हे काल्पनिक आहे. पण प्रत्यक्षात रहदारीत मोठी घट झाली आहे. हवेत एक नवीन ताजेपणा आला आहे आणि बरेच पक्षी परत आले आहेत.’
ट्रेंडिंग घडामोडी –
वेळच अशी आलीय की २४ शतकं केलेला हा खेळाडूही करतोय टाॅयलेट साफ
टॉप ५- असे खेळाडू ज्यांनी लावला होता मॅन ऑफ द सिरीजचा रतीब
टाॅप ५- कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले महारथी