आशिया चषक 2023 स्पर्धेच्या 14व्या हंगामाला 30 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. भारतीय संघाचे या स्पर्धेतील अभियान 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने होणार आहे. हा सामना श्रीलंकेत खेळला जाणार आहे. एकीकडे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या फलंदाजीची चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्या गोलंदाजीचीही चर्चा रंगली आहे. मात्र, आपण आता अशा विक्रमाविषयी जाणून घेणार आहोत, जी वाचून भारतीय क्रिकेटप्रेमी नक्कीच हैराण होऊ शकतो. हा विक्रम आहे आशिया चषकात सर्वाधिक विकेट्स घेण्याविषयी.
तसं पाहिलं, आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत भारतीय ताफ्यात असे गोलंदाज असतील, जे आशिया चषक स्पर्धेत जास्त खेळले नाहीत. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे खेळाडू अनुभवी आहेत, पण या स्पर्धेत त्यांनी फक्त 4-4 सामने खेळले आहेत. मात्र, एक नाव असे आहे, जे आगामी स्पर्धेत इतिहास रचू शकतो.
मोडू शकतो मुरलीधरनचा महाविक्रम
श्रीलंकेचा माजी दिग्गज मुथय्या मुरलीधरन हा वनडे आशिया चषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. तो 24 सामन्यांत 30 घेत अव्वलस्थानी आहे. मात्र, खास बाब अशी की, अव्वल 10मधील सुरुवातीच्या 8 खेळाडूंनी निवृत्ती घेतली आहे. तसेच, नवव्या आणि दहाव्या स्थानी अनुक्रमे भारताचा रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि बांगलादेशचा शाकिब अल हसन आहेत. दोघांच्या नावावर प्रत्येकी 19 विकेट्सची नोंद आहे. म्हणजेच, आगामी स्पर्देत दोघांकडे आशिया चषकातील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज बनण्याची संधी आहे.
आशिया चषक 2023 स्पर्धेत प्रत्येक संघ जास्ती जास्त 6 सामने खेळू शकतो. जर संघ सुपर 4 पर्यंत मजल मारू शकला आणि अंतिम सामन्यात गेला नाही, तर ते कमी कमी 5 सामने खेळतील.
जडेजाची वनडे आशिया चषकातील कामगिरी
जडेजाने वनडे आशिया चषकाच्या इतिहासात आतापर्यंत 14 सामन्यांच्या डावात 19 विकेट्स घेतले आहेत. भारतीय गोलंदाजांविषयी बोलायचं झालं, तर त्याच्या आसपासही कुणी नाहीये. आर अश्विन याच्या नावावर 14 विकेट्स आहेत, पण तो या स्पर्धेत संघाचा भाग नाहीये. याव्यतिरिक्त कुलदीप यादवने 10, जसप्रीत बुमराहने 9 आणि मोहम्मद शमीने 8 विकेट्स घेतल्या आहेत.
भारताकडून वनडे आशिया चषकात सर्वाधिक 22 विकेट्स इरफान पठाण याच्या नावावर आहेत. मात्र, तोही निवृत्त झाला आहे. अशात जडेजा भारताचा नंबर 1 गोलंदाज बनू शकतो. तसेच, त्याने जर 12 विकेट्स घेतल्या, तर तो वनडे आशिया चषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाजही बनू शकतो.
वनडे आशिया चषकात सर्वाधिक विकेट्स घेणारे सक्रिय गोलंदाज
19- रवींद्र जडेजा
19- शाकिब अल हसन
14- आर अश्विन (संघातून बाहेर)
10- राशिद खान
10- कुलदीप यादव (this indian cricketer eyes most wickets record in odi asia cup with shakib al hasan muralidharan on top 2023)
हेही वाचा-
‘मी जे पाहिलंय, त्यावरून हे स्पष्ट आहे…’, विराटच्या बॅटिंगविषयी माजी कोचचे सनसनाटी वक्तव्य
अर्रर्र…! संघाच्या अध्यक्षानेच महिला फुटबॉल खेळाडूला सर्वांदेखत केलं किस, डिलीट व्हायच्या आत पाहा व्हिडिओ