पुणे। पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील तिस-या पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज 2019 स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलींच्या गटात दुसऱ्या फेरीत आस्मि टिळेकर हिने मानांकित खेळाडूवर विजय मिळवत उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
(सेंटर फॉर पोलिस रिसर्च) सीपीआर, पाषाण येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत 12 वर्षाखालील मुलींच्या गटात आस्मि टिळेकर हिने नवव्या मानांकित सहाना कमलाकन्ननचा 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. अव्वल मानांकित आहाना अट्टावारने सई जाधववर 6-1 असा सहज विजय मिळवला. सातव्या मानांकित निशिता देसाईने अनुश्री शिरसाठचा टायब्रेकमध्ये 6-5(7-3) असा पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
14 वर्षाखालील मुले: दुसरी फेरी:
जय पवार(1) वि.वि.अवनीश गवळी 6-1;
सिद्धार्थ इंग वि.वि.अमन शहा 6-1;
तनिश बेलगळकर वि.वि.तनिष्क क्षत्रिय 6-1;
अभय नागराजन वि.वि.निनाद पाटील 6-1;
अद्विक नाटेकर(7) वि.वि.सन्मय तेलंग 6-2;
कौस्तुभ सलोडकर वि.वि.रुहान चावला 6-1;
अथर्व जोशी वि.वि.अनुज कदम 6-5(7-4);
अर्जुन किर्तने(12) वि.वि.आदित्य आडते 6-1;
पार्थ काळे(16) वि.वि.शिवम पाडिया 6-2;
12 वर्षाखालील मुली: दुसरी फेरी:
आहाना अट्टावार(1) वि.वि.सई जाधव 6-1;
केइशा सिन्हा वि.वि.ध्रुवा माने 6-3;
आस्मि टिळेकर वि.वि.सहाना कमलाकन्नन(9) 6-4;
प्रिशा शिंदे वि.वि.सरीशा जमेनिस 6-0;
ईशा मोहिते(6) वि.वि.आमिशा गर्ग 6-1;
निशिता देसाई(7) वि.वि.अनुश्री शिरसाठ 6-5(7-3);
नैशा कपूर वि.वि.मान्या बाजपेयी 6-0.