भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने पार पडले असून त्यात भारताने विजय मिळवला आहे. तिसरा कसोटी सामना 1 मार्चपासून इंदोरमध्ये खेळला जाणार आहे. या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघात अनेक बदल होताना दिसतील. त्याचवेळी संघाचा प्रमुख फलंदाज असलेला ट्रेविस हेड याने एक वक्तव्य करत ऑस्ट्रेलियाची योजना देखील सांगितली.
हेड हा ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज मानला जातो. मात्र, नागपूर येथे झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याला संधी मिळाली नव्हती. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाच्या रणनितीवर टीका केली गेलेली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याला संधी दिली गेली. डेव्हिड वॉर्नर दुखापतग्रस्त होऊन दुसऱ्या डावातून बाहेर झाल्यानंतर त्याने सलामीला येत आक्रमक सुरुवाती दिली.
डेव्हिड वॉर्नर मालिकेतील उर्वरित दोन सामन्यातून बाहेर गेल्यानंतर आता हेड संघाचा सलामीवीर म्हणून जबाबदारी सांभाळेल. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ कशाप्रकारे अवलंबणार असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला,
“भारताचे गोलंदाज अत्यंत कुशल आहेत. त्यांनी पहिल्या दोन सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी केली. मात्र, इंदोर कसोटीसाठी आम्ही वेगळी रणनीती आखली आहे. आम्ही नक्कीच सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू.”
तसेच या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याला संधी न मिळाल्याबद्दल त्याने दुःख व्यक्त केले. आपल्याला अशी अपेक्षा नव्हती असे त्याने म्हटले. हेड सध्या जागतिक कसोटी फलंदाजी क्रमवारीत चौथ्या स्थानी आहे. वॉर्नर मायदेशी परतल्याने आता उस्मान ख्वाजासह संघाला मोठी सलामी देण्याची जबाबदारी त्याला सांभाळावी लागणार आहे.
(Travis Head Talk About His Plans For Indore Test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शेन वॉर्नचा कसोटी रेकॉर्ड तोडण्यासाठी अँडरसन सज्ज! हव्या आहेत फक्त ‘एवढ्या’ विकेट्स
‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूने अजिंक्य रहाणेला मागितली मदत, फलंदाजी पाहून झालेला हैराण