आगामी टी-20 विश्वचषकासाठी मंगळवारी म्हणजेच 6 सप्टेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेचा संघ घोषित झाला. यावर्षीचा टी-20 विश्वचषक ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणार आहे. आफ्रिकी संघाचा वरच्या फळीतील प्रमुख फलंदाज रासी वॅन डर ड्यूसेन टी-20 विश्वचषकात खेळणार नाहीये. त्याच्या जागी युवा यष्टीरक्षक फलंदाज ट्रिस्टन स्टब्स याला 15 सदस्यीय संघात सामील केले गेले आहे.
दक्षिण आफ्रिकेचा युवा डेवाल्ड ब्रेविस (Dewald Bravis) टी-२० विश्वचषक खेळण्याना दिसेल, अशी अनेकांना अपेक्षा होती, परंतु त्याला या संघात संधी दिली गेली नाहीये. दुसरीकडे ट्रिस्टन स्टब्स (Tristan Stubbs) याला मात्र या संघात संधी मिळाली आहे. विशेष ब्रेविस आणि स्टब्स दोघेही आयपीएल फ्रॉंचायझी मुंबई इंडियन्ससाठी खेळतानात. दुसरीकडे रासी वॅन डर ड्यूसेन मात्र दुखापतीमुळे टी-२० विश्वचषक खेळणार असल्याचे सांगितले गेले आहे.
PROTEAS WORLD CUP SQUAD 🇿🇦
1⃣5⃣ players
🧢 World Cup debut for Tristan Stubbs
🤕 Rassie van der Dussen misses out due to injury#BePartOfIt #T20WorldCup pic.twitter.com/0Pzxm4uDQJ— Proteas Men (@ProteasMenCSA) September 6, 2022
टी-२० आणि भारत दौऱ्यासाठी निवडलेला दक्षिण आफ्रिका संघ –
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डिकॉक, हेनरिक क्लासेन, रीजा हेंड्रिक्स, केशव महाराज, एडेन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, रिले रोसॉव, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स.
महत्वाच्या बातम्या –
राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वी चार महिने अमेरिकेत प्रशिक्षण- रौप्य पदक विजेता अविनाश साबळे
हार्दिक पंड्या संघाचा पाचवा गोलंदाज बनू शकत नाही, दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया
‘त्यामुळे’ पाकिस्तानने भारताला मात दिली! गोलंदाजी प्रशिक्षकांनी कमी केले अर्शदीपच्या खांद्यावरील ओझे