---Advertisement---

चर्चा तर होणारच! भारतीय संघात कोरोनाचा प्रवेश झाल्याने चाहत्यांकडून आल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

---Advertisement---

सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय कसोटी संघाला यजमान इंग्लंडविरुद्ध ४ ऑगस्टपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. तसेच त्यापूर्वी २० ते २२ जुलैदरम्यान सराव सामना खेळायचा आहे. मात्र, त्याआधी भारतीय संघाला कोरोना व्हायरसचा तडाखा बसला आहे. त्यामुळे ट्विटरवर क्रिकेट चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि थ्रोडाऊन स्पेशालिस्ट दयानंद गरानी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी (१५ जुलै) दिली आहे. पंत ८ जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे तो सध्या ज्याठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह आढळला तिथे क्वारंटाईन आहे.

तसेच भारतीय संघाच्या हॉटेलमध्ये असलेले गरानी यांचा कोरोना चाचणी अहवाल १४ जुलै रौजी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांच्या संपर्कात असलेले भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, यष्टीरक्षक वृद्धिमान साहा आणि अभिमन्यू ईश्वरन यांनाही क्वारंटाईन व्हावे लागले आहे.

त्यामुळे सध्या क्रिकेट चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर भारतीय संघातील कोरोना व्हायरसच्या प्रवेशाचीच चर्चा रंगली आहे. अनेक चाहत्यांनी पंतवर बीसीसीआयने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर दिलेल्या ३ आठवड्यांच्या सुटीदरम्यान युरो कपचा सामना बघायला गेल्यामुळे टीका केली आहे. तर काही चाहत्यांनी भारताचे दोन्ही प्रमुख यष्टीरक्षक आयसोलेशनमध्ये असल्याने केएल राहुलला सराव सामन्यात यष्टीरक्षणाची संधी मिळू शकते, याकडे लक्ष वेधले आहे.

काही चाहत्यांनी भारतीय खेळाडू ३ आठवड्यांच्या सुटीदरम्यान गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळू शकले असते, असं म्हटलं आहे. त्याचबरोबर काहींनी पंतबद्दल सहानुभूतीही दाखवत लवकर बरा हो, अशा शुभेच्छा दिल्या असून काही चाहत्यांनी कोरोनामुळे सर्वच खेळांचे नुकसान होत असल्याची भावना व्यक्त केली आहे.

https://twitter.com/kunaalyaadav/status/1415661384331784193

https://twitter.com/Sanketjaingolu/status/1415555427476008967

https://twitter.com/SiddhiMeena92/status/1415605858105319429

https://twitter.com/anuj_antony/status/1415657488016281603

भारतीय संघाला सुटी महागात
भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यावर आल्यानंतर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता. त्यात भारताला न्यूझीलंड विरुद्ध ८ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर भारताला ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. पण त्यापूर्वी बीसीसीआयने भारतीय संघातील सदस्यांना ताजातवाना होण्यासाठी साधारण ३ आठवड्यांची सुटी दिली होती. ही सुटी भारतीय संघासाठी महागात पडत असल्याचे दिसत आहे.

भारतीय संघाचे डरहॅमला सराव शिबिर
जवळपास ३ आठवड्यांच्या सुटीनंतर भारतीय खेळाडू इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेची तयारी करण्यासाठी डरहॅम येथे आले आहेत. भारतीय संघ डरहॅम येथे सराव शिबिर पूर्ण करुन आणि सराव सामना खेळल्यानंतर इंग्लंड विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी नॉटिंघमला रवाना होईल. सध्या आयसोलेशनमध्ये असलेले भारताचे सदस्य डरहॅमला आलेले नाहीत. ते त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करुन भारतीय संघात सामील होतील.

असे आहे इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेचे वेळापत्रक
४-८ ऑगस्ट – पहिला कसोटी सामना, नॉटिंगघम
१२-१६ ऑगस्ट – दुसरा कसोटी सामना, लॉर्ड्स
२५-२९ ऑगस्ट – तिसरा कसोटी सामना, हेडिंग्ले
२-६ सप्टेंबर – चौथा कसोटी सामना, लंडन
१०-१४ सप्टेंबर – पाचवा कसोटी सामना, मँटेस्टर

असा आहे इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ –
विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धिमान साहा.
राखीव खेळाडू – अभिमन्यू ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागासवाला

महत्त्वाच्या बातम्या – 

‘मी फक्त सांगतोय!’ भारताचे दोन्ही यष्टीरक्षक आयसोलेशनमध्ये असल्याने दिनेश कार्तिकने पुढे केला मदतीचा हात?

आर अश्विन-डॅनिएल वॅटमध्ये ट्विटरवर रंगलेल्या गमतीशीर संभाषणाने वेधले क्रिकेट चाहत्यांचे लक्ष

भारताविरुद्ध सराव सामना खेळण्यासाठी काउंटी इलेव्हन सज्ज, ‘या’ १४ खेळाडूंची संघात निवड

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---