---Advertisement---

यू मुंबा टीटी संघाची UTT सीझन 4 मध्ये विजयी सुरुवात

---Advertisement---

पुणे, 14 जुलै 2023 : पुण्यातील महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या इंडियन ऑइल अल्टिमेट टेबल टेनिस सीझन 4 मध्ये यू मुंबा टीटी संघाने विजयी सुरुवात केली. यू मुंबाने अटीतटीच्या सामन्यात बंगळुरू स्मॅशर्सचा पराभव केला.

टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया (TTFI) च्या संयुक्त विद्यमाने निरज बजाज आणि विटा दाणी यांनी प्रमोट केलेली फ्रँचायझी-आधारित लीग 2017 मध्ये स्थापन झाल्यापासून भारतीय टेबल टेनिससाठी गेम चेंजर आहे. चौथ्या हंगाम देखील त्यात यश मिळवण्याचा प्रयत्न करेल.

यू मुंबाने 10-5 अशा फरकाने बंगळुरू स्मॅशर्सचा पराभव करताना इंडियन ऑइल अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ मधील टाय जिंकली, जी DafaNews द्वारे गतविजेत्यांना समर्थित केली गेली.

पुरूष एकेरीच्या पहिल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत 58 व्या स्थानावर असलेल्या किरिल गेरासिमेन्कोने जागतिक क्रमवारीत 18 व्या स्थानावरील कादरी अरुणा याच्यावर 2-1 असा धक्कादायक विजय मिळवला. या विजयाने बंगळुरू स्मॅशर्सच्या खात्यात दोन महत्त्वपूर्ण गुण जमा झाले. बंगळुरूच्या खेळाडूने सकारात्मक सुरुवात करताना काही सुरेख फटके मारले अन् 11-3, 9-11, 11-8 असा रोमहर्षक विजय मिळवला.

महिला एकेरी गटात अनुभवी मनिका बात्राने 2-1 अशा फरकाने दिया चितळेचा पराभव करून बंगळुरू स्मॅशर्सची गुणसंख्या 4-2 अशी वाढवली. जागतिक क्रमावारीत 35 व्या स्थानावर असलेल्या मनिकाने 11-10, 7-11, 11-6 असा आक्रमक खेळ करून विजय मिळवला.

यू मुंबा टीटी संघाने मिश्र दुहेरीच्या लढतीतून सामन्यात पुनरागमन केले. मानव ठक्कर आणि लिली झँग या जोडीने मनिका वा किरिल या जोडीचा 2-1 ( 11-10, 10-11, 11-6) असा पराभव करून बंगळुरूची आघाडी 5-4 अशी कमी केली.

मानवने दमदार खेळ सुरूच ठेवताना पुरुष एकेरीत सनिल शेट्टीवर विजय मिळवून चौथा सामना जिंकला. त्याने सनिलवर 3-0 (11-8, 11-3, 11-7) असा दणदणीत विजय मिळवून यू मुंबा टीटीला 7-5 अशी आघाडी मिळवून दिली.

अखेरच्या सामन्यात लिली झँगने बंगळुरूच्या नतालिया बाजोरचा 3-0 ( 11-6, 11-5, 11-4 ) असा सहज पराभव करून यू मुंबाचा विजय पक्का केला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---