---Advertisement---

दुसऱ्या कसोटीतून कुलदीप यादव का बाहेर झाला? उमेश यादवने सांगितले कारण

On: गुरूवार, डिसेंबर 22, 2022 11:50 PM
---Advertisement---

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात कुलदीप यादव सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता आणि यासाठी त्याला सामनावीर पुरस्कार देखील मिळाला होता. एवढ्या चांगल्या प्रदर्शनानंतर देखील दुसऱ्या कसोटीत त्याला संधी मिळाली नाही. याविषयी बोलताना वेगवान गोलंदाज उमेश यादव याने खास प्रतिक्रिया दिली.

उमेश यादव बांगलादेशविरुद्ध गुरुवारी (22 डिसेंबर) रोजी सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळला. पहिल्या डावात उमेश भारतासाठी सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला. त्याने 15 षटकांमध्ये 25 धावा खर्च करून 4 विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव (Kuldeep Yadav ) पहिल्या कसोटीप्रमाणेच दुसऱ्या कसोटीत देखील कामगिरी करेल असा सर्वांचा अदाज होता. मात्र संघ व्यवस्थापनाने त्याला संघातून वगळल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. याविषयी स्पष्टीकरण देताना उमेशने स्वतःचेच उदाहरण दिले, जो अनेकदा गुणवत्ता असून देखील संघातून बाहेर राहिला आहे.

पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर उमेश यादव (Umesh Yadav ) माध्यमांशी बोलत होता. यावेळी त्याने कुलदीपविषयी मत मांडले. तो म्हणाला की, “हा तुमच्या प्रवासाचा भाग आहे. हे सर्व माझ्यासोबत देखील झाले आहे. कधी-कधी तुम्ही तुमच्या प्रदर्शनामुळे संघातून बाहेर असता, तर कधी संघ व्यवस्थापनाच्या निर्णयामुळे. संघाच्या गरजेप्रमाणे तुम्हाला देखील पुढे चालत राहायचे असेत. ही त्याच्यासाठी (कुलदीप) चांगली बाब आहे की, त्याने संघात पुनरागमन केले आणि चांगले प्रदर्शन देखील केले.”

दरम्यान उभय संघांतील या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ सध्या भक्कम स्थितीत दिसत आहे. बांगलादेशचा पहिला डाव पहिल्याच दिवशी अवघ्या 227 धावांवर गुंडाळला गेला. भारतासाठी उमेश यादवप्रमाणेच फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने देखील चार विकेट्स घेतल्या. कुलदीपच्या जागी संघ व्यवस्थापनाने वेगवेग गोलंदाज जयदेव उनाडकड याला संघात संधी दिली, ज्या पहिल्या डावात दोन विकेट्सही घेतल्या. उनाडकडने मागच्या 10 वर्षांनंतर भारतासाठी कसोटी सामना खेळला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने बिनबाद 19 धावा केल्या आहेत. (Umesh Yadav explained the reason for dropping Kuldeep Yadav from the team)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! करोडो मिळण्याची शक्यता असतानाच इंग्लिश खेळाडूने घेतले आयपीएल लिलावातून नाव मागे
भारत आणि पाकिस्तान द्विपक्षीय मालिका होणार? पीसीबीच्या नव्या अध्यक्षांनी मांडली भूमिका 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---