Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक! करोडो मिळण्याची शक्यता असतानाच इंग्लिश खेळाडूने घेतले आयपीएल लिलावातून नाव मागे

December 22, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
England-Cricket-Team

Photo Courtesy: Twitter/ICC


इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2023च्या हंगामाचा लिलाव शुक्रवारी (23 डिसेंबर) कोची येथे होणार आहे. या लिलावात 405 खेळाडूंवर बोली लागणार होती. मात्र, लिलावाच्या केवळ एक दिवस आधी इंग्लंडचा युवा फिरकीपटू रेहान अहमद याने या लिलावातून नाव मागे घेतले आहे. 

चालू वर्षाच्या सुरुवातीला अंडर 19 विश्वचषकातून नावारुपाला आलेला लेगस्पिनर रेहान अहमद याने नुकतेच पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. कराची कसोटीत त्याने पाच बळी मिळवण्याची कामगिरी केली होती. पाच बळी मिळवणारा गोलंदाज म्हणून त्याची नोंद झालेली.

रेहान याने आयपीएल 2023 साठी आपले नाव नोंदवले होते. त्याने लिलावात आपली आधारभूत किंमत 40 लाख रुपये ठेवलेली. युवा तसेच सध्या शानदार फॉर्ममध्ये असल्याने त्याच्यावर बरेच संघ बोली लावण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता त्याने हा निर्णय घेत सर्वांना चकित केले आहे. आगामी काळात प्रथमश्रेणी व कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचे त्याने म्हटले.

इंग्लंडच्या कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅकलम याने रेहान याने आयपीएल खेळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. आयपीएलसारखी जागतिक दर्जाची स्पर्धा खेळल्याने रेहान याला कारकीर्दीच्या सुरुवातीलाच मोठा फायदा होईल असे, मॅकलम यांना‌ वाटत होते.

रेहान हा काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये लिसेस्टरशायर संघाचे प्रतिनिधित्व करतो. चालू वर्षाच्या जानेवारी महिन्यात वेस्ट इंडीज येथे झालेल्या अंडर 19 विश्वचषकात इंग्लंड संघाला अंतिम फेरीपर्यंत नेण्यात त्याचा मोठा वाटा राहिला होता. मात्र, अंतिम सामन्यात इंग्लंडला भारतीय संघाने पराभूत केलेले.

(England Young Leggy Rehan Ahmed Opt Out His Name From IPL 2023 Auction)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चलनी नोटांवर शोभणार जगज्जेता मेस्सी? अर्जेंटिना सरकार लवकरच घेऊ शकते निर्णय
“म्हणून मी कर्णधार म्हणून धोनीची शिफारस केली”, 15 वर्षानंतर सचिनने केला खुलासा 


Next Post
Najam Sethi

भारत आणि पाकिस्तान द्विपक्षीय मालिका होणार? पीसीबीच्या नव्या अध्यक्षांनी मांडली भूमिका

Photo Courtesy: Twitter/BCCI Domestic

रणजी ट्रॉफी: मुंबई-गुजरातचे दणदणीत विजय; लिलावाआधी युवा खेळाडूंनी दाखवली चमक

Kuldeep Yadav with Virat

"कुलदीपला वगळणे योग्यच", संघ व्यवस्थापनाच्या निर्णयाला दिग्गजाचा पाठिंबा

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143