मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर यजमान ऑस्ट्रेलिया आणि पाहुण्या भारतीय संघात बॉक्सिंग डे कसोटी सामन्याची अत्यंत रोमांचक लढत झाली. या लढतीत भारताने ८ विकेट्स राखून विजय मिळवला आहे. यासह भारताने मालिकेत १-१ ची बरोबरी साधली आहे. पण या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताला जोरदार धक्का बसला. त्यांचा वेगवान गोलंदाज उमेश यादव गोलंदाजी करताना गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याचे षटकही तो अर्ध्यात सोडून मैदानाबाहेर पडला. म्हणून येत्या तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याची खेळण्याची शक्यता खूप कमी आहे.
असी झाली उमेश यादवला दुखापत
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर जो बर्न्स आणि मॅथ्यू वेड सलामीला फलंदाजीसाठी मैदानावर उतरले. पण यादवने त्याच्या दुसऱ्याच षटकात बर्न्सला झेलबाद करत संघाला पहिली विकेट मिळवून दिली. त्यानंतर पुढील तिसऱ्या षटकातही अवघ्या दोन धावा दिल्या. परंतु, त्याच्या चौथ्या आणि डावातील आठव्या षटकातील तिसरा चेंडू टाकत असताना त्याच्या पोटरीमध्ये ताण आल्याचे दिसले. त्यामुळे मैदानावरच तो लंगडू लागला.
त्यानंतर लगेचच भारतीय संघाचे फिजिओ मैदानावर आले आणि त्यांनी यादवचा तपासले. पण त्याच्या पायाची स्थिती गंभीर दिसत असल्यामुळे त्याला मैदानातून बाहेर घेऊन जाण्यात आले. त्याच्या उर्वरित षटकात युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने गोलंदाजी केली. उमेशला ही दुखापत झाल्यानंतर त्याच्या पोटरीचे स्कॅनदेखील करण्यात आले.
यादवच्या जागी टी नटराजनला मिळू शकते संधी
माध्यमातील वृत्तांनुसार, यादवची दुखापत गंभीर असल्याची शक्यता आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात यादवच्या जागी युवा गोलंदाज टी नटराजनला संधी दिली जाऊ शकते.
This doesn't look good for Umesh Yadav. He's pulled up gingerly and is hobbling off the field #AUSvIND pic.twitter.com/ncOESNol2m
— 7Cricket (@7Cricket) December 28, 2020
Umesh Yadav complained of pain in his calf while bowling his 4th over and was assessed by the BCCI medical team. He is being taken for scans now. #AUSvIND pic.twitter.com/SpBWAOEu1x
— BCCI (@BCCI) December 28, 2020
जर उमेश बाहेर पडला तर भारतासाठी हा मोठा धक्का असेल. कारण सध्या भारताचे इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी हे तिन्ही प्रमुख वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त असल्याने या कसोटी मालिकेचा भाग नाहीत. अशात उमेश यादवही जर दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाला संघाचे गोलंदाजी आक्रमण बऱ्याच प्रमाणात बुमराहवर अवलंबून असेल.
तिसरा कसोटी सामनाही होणार मेलबर्नमध्ये?
भारत-ऑस्ट्रेलियाची दौऱ्याची सुरुवात होण्यापुर्वी जाहीर करण्यात आलेल्या वेळेपत्रकानुसार तिसरा कसोटी सामना सिडनी येथे होणार आहे. परंतु सिडनीतील कोविड-१९ ची परिस्थिती बिघडत असल्यामुळे हा सामना मेलबर्नच्या मैदानावरच होण्याची शक्यता आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने काही दिवसांपुर्वी या संदर्भात अधिकृत माहिती दिली होती.
नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात हा सामना खेळला जाणार आहे. ७ जानेवारी ते ११ जानेवारी या कालावधीत हा सामना होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाच्या अडचणीत भर! गोलंदाजी करताना उमेश यादव ‘असा’ झाला दुखापतग्रस्त, पाहा व्हिडिओ
वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह, स्कॅनसाठी मैदानातून बाहेर
समय आ गया है आपसे विदा लेने का..! अगरवालच्या खराब फलंदाजीनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस