---Advertisement---

काय सांगता! अंपायरने ऍशेसच्या पहिल्याच दिवशी दिले ७ चूकीचे निर्णय

On: शुक्रवार, ऑगस्ट 2, 2019 2:38 PM
---Advertisement---

बर्मिंगहॅम। गुरुवारपासून (1 ऑगस्ट) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना एजबस्टन स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानावरील पंच अलीम दार आणि जोएल विल्सन यांनी दिलेल्या अनेक चूकीच्या निर्णयांवर टीका झाली आहे.

त्यांनी मिळून पहिल्या दिवशी 7 निर्णय चूकीचे दिले. त्यातील 5 निर्णय डिसिजन रिव्ह्यू सिस्टिम (डीआरएस) मुळे बदलण्यात आले. मात्र डेव्हिड वॉर्नर आणि जेम्स पॅटिन्सन पंचांच्या चूकीच्या निर्णयाचे शिकार झाले. या दोघांनाही नाबाद असतानाही पंचांनी बाद दिल्याने आणि त्यांनी डीआरएसची मदत न घेतल्याने पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

याबरोबरच उस्मान ख्वाजा, स्टिव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, पिटर सिडल यांच्याबाबतीतही चूकीचे निर्णय देण्यात आले होते. ख्वाजाला पंचांनी नाबाद दिले होते. पण इंग्लंडने डीआरएसची मदत घेतली. यात तो बाद असल्याचे दिसून आले. मॅथ्यू वेडच्या बाबतीतही असेच झाले. त्यालाही पंचांनी नाबाद दिले होते पण इंग्लंडने घेतलेल्या डीआरएसमध्ये तो बाद असल्याचे दिसले.

त्याचबरोबर या सामन्यात 144 धावांची शतकी खेळी करणारा स्मिथ 34 धावांवर खेळत असताना पंचांनी त्याला एका चेंडूवर पायचीत बाद दिले होते. परंतू त्याने लगेचच डीआरएसची मागणी केली. यात तो नाबाद असल्याचे दिसले. पुढे जाऊन स्मिथने शतकी खेळी केली.

स्मिथ प्रमाणे पिटर सिडललाही पंचांनी 47 व्या षटकात पायचीत बाद दिले होते. परंतू त्याने डीआरएसची मदत घेतली. यात तो नाबाद असल्याचे दिसून आले.

पंचांनी पहिल्या दिवशी केलेल्या या चूकांमुळे पंचांच्या स्तरावर मोठ्याप्रमाणात टीका होत आहे. याआधीही 2019 विश्वचषकात पंचांकडून देण्यात आलेल्या चूकीचे निर्णयांवर मोठी चर्चा झाली होती.

ऍशेस मालिकेतील एजबस्टनवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाखेर इंग्लंड पहिल्या डावात बिनबाद 10 धावांवर खेळत आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 284 धावा केल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

…म्हणून जेम्स अँडरसनने मागितली इंग्लंड संघाची माफी

तब्बल १५ महिन्यांनी कसोटीत पुनरागमन करत स्मिथने तोडला विराट कोहलीचा हा विक्रम

आता मास्टर-ब्लास्टर करणार या चित्रपटात भूमिका…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment