---Advertisement---

वरुण चक्रवर्तीच्या नावे नोंदवला लाजीरवाणा विक्रम, टी20 मधील पहिलाच इतका दुर्दैवी खेळाडू

On: बुधवार, जानेवारी 29, 2025 9:04 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेत पुन्हा एकदा शानदार गोलंदाजी केली. पहिल्या दोन सामन्यात पाच विकेट्स घेणाऱ्या वरुण चक्रवर्तीने तिसऱ्या सामन्यातही पाच विकेट्स घेतल्या. मात्र या पाच- विकेट्सचा टीम इंडियाला काही फायदा झाला नाही. कारण संघानं राजकोटमध्ये खेळलेला तिसरा टी20 सामना हरला. परंतु, चांगली गोष्ट म्हणजे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. परंतु वरुणच्या नावावर एक लाजिरवाणा जागतिक विक्रमही नोंदवला गेला आहे.

वरुण चक्रवर्ती हा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पराभवाच्या वेळी दोनदा पाच बळी घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने याआधीही अशी गोलंदाजी केली आहे. पण तो सामनाही संघाने गमावला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये वरुण चक्रवर्तीने गकबेरा येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 17 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या होत्या. परंतु टीम इंडियाने तो सामनाही गमावला. यावेळी त्याने इंग्लंडविरुद्ध टी20 सामन्यात 24 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या आणि यावेळीही संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

जुलै 2021 मध्ये टीम इंडियासाठी टी20 आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या वरुण चक्रवर्तीने पहिल्या 6 सामन्यांमध्ये फक्त 2 विकेट घेतल्या. यानंतर, तो सुमारे तीन वर्षे संघापासून दूर राहिला. परंतु जेव्हापासून तो परतला तेव्हापासून तो शानदार फॉर्ममध्ये दिसून येत आहे. पहिल्या 6 सामन्यांमध्ये 2 विकेट घेणाऱ्या वरुण चक्रवर्तीने पुढील 10 सामन्यांमध्ये 27 विकेट घेतल्या आहेत. ज्यात त्याने दोनदा पाच बळी घेतले आहेत. तर तीनदा त्याने एका डावात 3 बळी घेतले आहेत.

हेही वाचा-

संघ व्यवस्थापनाचा ढिसाळ निर्णय आणि…., जाणून घ्या भारताच्या पराभवाची पाच मोठी कारणं
IND VS ENG; इंग्लंंडचा कमबॅक, राजकोटमध्ये भारताचा निसटता पराभव
‘आयसीसी पुरूष क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाल्यानंतर बुमराह म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---