पुणे। विलास इलेव्हन यांच्या वतीने आयोजित तेंडुलकर करंडक 16 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत विलास इलेव्हन संघाने अदित्य स्पोर्टस् अकादमी संघाचा तर स्पोर्टस् पार्क अकादमी संघाने आरपीसीए संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
डीएसके विश्व स्टार क्रिकेट अकादमी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत साहिल नागलेच्या दमदार अष्टपैलु कागिरीच्या जोरावर विलास इलेव्हन संघाने अदित्य स्पोर्टस् अकादमी संघाचा 9 गडी राखून पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. पहिल्यांदा खेळताना साहिल नागले व रोहन गावडे यांच्या अचूक गोलंदाजीने अदित्य स्पोर्टस् अकादमी संघाचा डाव 20 षटकात 9 बाद 107 धावांत रोखला.
107 धावांचे लक्ष साहिल नागलेच्या नाबाद अर्धशतकासह विलास इलेव्हन संघाने केवळ 11.3 षटकात 1 बाद 108 धावा करून विजय मिळवला. 23 धावात 3 गडी बाद व 43 चेंडूत 54 धावा करणारा साहिल नागले सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत मानव अल्वानीच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर स्पोर्टस् पार्क अकादमी संघाने आरपीसीए संघाचा 41 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेऴताना श्रेयस जाधवच्या 53 व समर्थ देशमुखच्या नाबाद 42 धावांसह स्पोर्टस् पार्क अकादमी संघाने 20 षटकात 6 बाद 139 धावा केल्या.
139 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मानव अल्वानी, सरिष सेदाई व समर्थ जगताप यांच्या आचूक गोलंदाजीपुढे आरपीसीए संघ 20 षटकात 8 बाद 98 धावांत गारद झाला. मानव अल्वानी सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी।
अदित्य स्पोर्टस् अकादमी- 20 षटकात 9 बाद 107 धावा(पियुष बाफना 34(27), भार्गव महाजन 18(16), साहिल नागले 3-23, रोहन गावडे 2-12) पराभूत वि विलास इलेव्हन- 11.3 षटकात 1 बाद 108 धावा(साहिल नागले नाबाद 54(43), रुद्राज घोसले नाबाद 18(17), ओम पाटील 10(9)) सामनावीर- सहिल नागले
विलास इलेव्हन संघाने 9 गडी राखून सामना जिंकला
स्पोर्टस् पार्क अकादमी- 20 षटकात 6 बाद 139 धावा(श्रेयस जाधव 53(47), समर्थ देशमुख नाबाद 42(28), शर्विन किसवे 16(25), साहिल मदार 1-13, शुभम पाटील 1-28) वि.वि आरपीसीए- 20 षटकात 8 बाद 98 धावा(अंकित मुखर्जी 41(31), अभिषेक पाडवी 30(44), मानव अल्वानी 2-7, सरिष सेदाई 3-14, समर्थ जगताप 2-27) सामनावीर- मानव अल्वानी
स्पोर्टस् पार्क अकादमी संघाने 41 धावांनी सामना जिंकला.