भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. कसोटीचा दुसरा दिवस इंग्लंड संघाच्या नावावर राहिला. अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि कर्णधार जो रूटने इंग्लंडला सामन्यात पुनरागमन करुन दिले. अँडरसनच्या योगदानामुळे भारताचा पहिला डाव ३६४ धावांवर संपुष्टात आला. तर इंग्लंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३ विकेट गमावून ११९ धावा केल्या आहेत. दरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहली याचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल, मोहम्मद सिराज, मयंक अगरवाल, प्रसिद्ध कृष्णा आणि इशांत शर्मा बाल्कनीमध्ये विराटसोबत अससल्याचे दिसत आहेत. तर भारतीय कर्णधार विराट उभे राहून नागिन डान्स करताना दिसत आहे. या फोटोत विराटच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे. त्याचा मजेशीर डान्स पाहून बाजूला बसलेले भारतीय खेळाडू हसताना दिसत आहेत.
क्रिकेटप्रेमींनाही विराटचा डान्स खूप आवडल्याचे दिसत आहे. अनेकांनी त्याच्या या फोटोंना पसंती दर्शवली आहे. काहींनी तर तो नागपंचमीच्या निमित्ताने नागिन डान्स करत असल्याचे म्हटले आहे. तसे तर, विराटने मैदानावर किंवा मैदानाबाहेर डान्स करण्याची ही पहिली वेळ नाही. बऱ्याचदा तो सराव करतानाही ठुमके लगावताना दिसला आहे.
Moment of the Day.😍💙
King Kohli dancing in Lord's Balcony.😍😂 #ViratKohli #ENGvsIND pic.twitter.com/BJeCZNIv68
— Neha Sharma (@imneha30) August 13, 2021
https://twitter.com/peachworld26/status/1426152511627436041?s=20
मात्र, कसोटीचा दुसरा दिवस भारतासाठी चांगला गेला नाही आणि भारतीय संघाने आपले उर्वरित ७ गडी केवळ ८८ धावा जोडून गमावले. केएल राहुल १२९ धावांची खेळी खेळून पहिल्याच षटकात बाद झाला. त्यापुढील षटकात भारताने अजिंक्य रहाणेने विकेट गमावली. रिषभ पंत (३७ धावा) आणि रवींद्र जडेजा (४० धावा) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने पाच बळी घेतले.
भारताच्या ३६४ धावांच्या पाठलागासाठी फलंदाजीस उतरलेल्या इंग्लिश संघाची चांगली सुरुवात झाली नाही. मोहम्मद सिराजने डोमिनिक सिबली (११ धावा) आणि हसीद हमीदला खाते न उघडता पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर रोरी बर्न्सने कर्णधार जो रूटसह तिसऱ्या विकेटसाठी ८५ धावा जोडल्या. दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी मोहम्मद शमीने बर्न्सला ४९ धावांवर बाद करून भारतीय संघाला दिलासा दिला. रूट ४८ धावा करून खेळपट्टीवर उभा आहे, तर जॉनी बेअरस्टो कर्णधाराला ६ धावा करून कर्णधारास साथ देत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
परदेशी मैदानांवर यष्टीरक्षक रिषभचाच बोलबाला, ३७ धावांच्या खेळीसह मोडलाय धोनीचा ‘हा’ रेकॉर्ड
बांगलादेश संघाचा फलंदाजी प्रशिक्षक बनण्यासाठी ‘या’ क्रिकेटरने आपल्या देशातील टीमची सोडली साथ