भारत आणि श्रीलंका (INDvSL) यांच्यादरम्यान वनडे मालिकेतील पहिला मंगळवारी (10 जानेवारी) खेळला गेला. गुवाहाटी येथील बारसपारा स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली. विराटने या सामन्यात आपल्या वनडे कारकिर्दीतील 45 वे शतक पूर्ण करत भारताच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. त्याचबरोबर विराटने भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचे अनेक विक्रम मोडले आहेत. मात्र, एक विक्रम असा आहे जो विराट कदाचित वनडे क्रिकेटमध्ये मोडू शकणार नाही.
सचिन तेंडुलकर याचा उत्तराधिकारी म्हणून विराट कोहलीकडे पाहिले जाते. सचिनचे बरेच विक्रम विराटने मोडीत काढले आहेत. तसेच आगामी काळात तो आणखी काही विक्रम आपल्या नावे नोंद करू शकतो. मात्र, वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवण्याचा विक्रम तो कदाचित आपल्या नावे करू शकणार नाही.
विराटला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला. हा त्याच्या वनडे कारकिर्दीतील 37 वा सामनावीर पुरस्कार ठरला. तर, सचिनने आपल्या कारकीर्दीत 463 वनडे सामने खेळताना 62 सामनावीर पुरस्कार आपल्या नावे केले होते. विराट सध्या 34 वर्षांचा असून, पुढील चार वर्ष तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतो. त्यामुळे सचिनचा हा विक्रम मोडण्याची शक्यता कमी आहे.
या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी माजी कर्णधार सौरव गांगुली आहे. त्याने 311 सामन्यात 31 सामनावीर पुरस्कार मिळवलेले. तर, अष्टपैलू युवराज सिंग याने 307 सामन्यात 27 सामनावीर पुरस्कारांवर नाव कोरलेले.
(Virat Kohli Can’t Break Sachin Tendulkar Most Man Of The Match In ODI)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हद्दच केली! पायात चप्पल घालून शाकिब अल हसन खेळपट्टीवर, पंचांसोबत वाद घातल्यानंतर मोठी कारवाई
पक्की माहिती, पंत नाही खेळणार आयपीएल! सौरव गांगुलींनी केले स्पष्ट