शुक्रवारी(5 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स संघात आयपीएलचा 17 वा सामना पार पडला. या सामन्यात आंद्रे रसलने 13 चेंडूत नाबाद 48 धावा करत कोलकताला 5 विकेट्सने विजय मिळवून दिला. मात्र बेंगलोरला आयपीएल 2019 मधील हा सलग 5 वा पराभव स्विकारावा लागला आहे.
असे असले तरी बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात 49 चेंडूत 84 धावा करत ट्वेंटी20 क्रिकेट प्रकारात एक खास विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये 8000 धावांचा टप्पा पार केला आहे.
हा टप्पा पार करणारा तो केवळ दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी हा टप्पा सुरेश रैनाने पार केला होता. तसेच ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये 8000 धावा पूर्ण करणारा विराट जगातील सातवा खेळाडू ठरला आहे.
विराटचे आता ट्वेंटी क्रिकेटमध्ये 257 चेंडूत 40.94 च्या सरासरीने 8067 धावा झाल्या आहेत. यात त्याच्या 4 शतके आणि 59 अर्धशतकांचा समावेश आहे.
शुक्रवारी झालेल्या या सामन्यात बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना विराट आणि एबी डिविलियर्सने(63) केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर 3 बाद 205 धावा केल्या होत्या आणि कोलकता समोर 206 धावांचे आव्हान ठेवले होते.
या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकताला शेवटच्या चार षटकात 66 धावांची गरज होती. त्यावेळी रसलने षटकारांची बरसात करत 48 धावांची तुफानी खेळी केली आणि कोलकताला 19.1 षटकातच 5 सहज विजय मिळवून दिला.
ट्वेंटी20 मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –
12457 धावा – ख्रिस गेल (374 सामने)
9922 धावा – ब्रेंडन मॅक्यूलम (370 सामने)
9087 धावा – किरॉन पोलार्ड (463 सामने)
8701 धावा – शोएब मलिक (345 सामने)
8375 धावा – डेव्हिड वॉर्नर (263 सामने)
8110 धावा – सुरेश रैना (306 सामने)
8067 धावा – विराट कोहली (257 सामने)
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषकाआधी आफगाणिस्तानच्या संघात मोठा बदल, राशिद खानला केले कर्णधार
–चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी…
–२०१९ विश्वचषकासाठी अफगाणिस्तान संघाने घोषीत केला या संभाव्य खेळाडूंचा संघ