भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांची लिस्ट काढायची झाल्यास टॉप पाचमध्ये एक नाव असेल ते म्हणजे विराट कोहली याचे. विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाने एखादा वर्ल्डकप जिंकला नाही. मात्र, सर्व फॉरमॅटमध्ये टीम इंडिया अव्वल नंबरवर पोहोचली. ऑस्ट्रेलियात टेस्ट सिरीज जिंकली. जगातील सर्व संघांना हरवून टीम इंडियाला जिंकण्याची सवय लागली. एमएस धोनी याचा उत्तराधिकारी म्हणून त्याने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली. त्याला नेतृत्व करण्याचा अनुभव एजग्रूप क्रिकेटपासून होता. विराटच्याच नेतृत्वात इंडियाच्या अंडर नाईन्टीन संघाने 2008 मध्ये वर्ल्ड कप जिंकला. मोहम्मद कैफनंतर अंडर नाईन्टीन वर्ल्डकप जिंकणारा तो केवळ दुसरा भारतीय कॅप्टन. मात्र, त्या वर्ल्डकपसाठी विराट फर्स्ट चॉईस नव्हताच! होय, त्यावेळी अखेरच्या क्षणी विराटला कॅप्टन केले गेलेले. नक्की काय होते ते प्रकरण आणि कशाप्रकारे विराट बनलेला यंग इंडियाचा कॅप्टन? याचा उलगडा करणारा हा लेख.
सन 2000 मध्ये मोहम्मद कैफच्या नेतृत्वात भारताच्या अंडर नाईन्टीन संघाने पहिला वर्ल्डकप जिंकला. त्यानंतर यंग इंडिया दरवेळी फेवरेट म्हणून वर्ल्डकपमध्ये सहभागी होत राहिली. पुढचे दोन वर्षे सेमी फायनल आणि 2006 ला फायनलमध्ये यंग इंडिया पराभूत झाली. अशात 2008 मध्ये मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे अंडर नाईन्टीन वर्ल्डकप आयोजित केला गेला. मागील वर्षभरापासून इंडियाची अंडर नाईन्टीन टीम जबरदस्त परफॉर्मन्स देत आलेली. टीम जवळपास सेटल होती. फक्त अनाउन्समेंट बाकी राहिलेली.
वर्ल्डकप टीमचे सिलेक्शन करण्यासाठी 14 जानेवारी रोजी मीटिंग ठरली. दिल्लीचे संजीव शर्मा कमिटीचे चेअरमन होते, तर इतर सदस्यांमध्ये व्ही चामुंडेश्वर नाथ, काजल दास, राकेश पारिख व कैलास गट्टानी यांचा समावेश होता. टीम जाहीर झाली आणि अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण, मागच्या वर्षभरापासून यशस्वीरित्या टीमला लीड केलेला तन्मय श्रीवास्तव वर्ल्डकपसाठी कॅप्टन नव्हता. त्याच्या जागी विराट कोहलीला कॅप्टन बनवले गेलेले. इतकंच नव्हेतर व्हाईस कॅप्टन म्हणून देखील ऑलराऊंडर रवींद्र जडेजाची वर्णी लागलेली. त्यावेळी अंडर नाईन्टीन क्रिकेट फॉलो करणाऱ्यांसाठी ही अनपेक्षित घटना होती. परफॉर्मन्स आणि लीडरशिप या दोन्ही पातळीवर उत्तर प्रदेशचा तन्मय श्रीवास्तव विराटला सरस होता. मीडियात चर्चा सुरू झाली की, संजीव शर्मा दिल्लीचे असल्याने त्यांनी विराटला झुकते माप दिले. कोच म्हणून एनसीएतून थेट डेव्हिड बून यांना बोलावले गेले.
या सर्व घटनाक्रमात विराटला कॅप्टन म्हणून पसंती का दिली गेली? याचे उत्तर होतं त्याचा फर्स्ट क्लास क्रिकेट खेळण्याचा अनुभव. पाच फर्स्ट क्लास मॅच खेळलेल्या विराटने 53च्या ऍवरेजने 373 धावा केलेल्या. त्यात एक दीडशतक ही सामील होते. पुढे विराटच्या नेतृत्वात यंग इंडिया मलेशियाला गेली. कॅप्टनशी गेली तरी तन्मय श्रीवास्तव एक स्तंभ म्हणून संघासोबत राहिला. टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक 262 रन्स तन्मयने केले. दुसरीकडे विराटही फॉर्ममध्ये दिसला आणि 235 रन्स काढण्यात यशस्वी झाला. फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवत विराटच्या टीमने अंडर नाईन्टीन वर्ल्डकप दुसऱ्यांदा भारतात आणलेला. इथूनच विराटला एक अग्रेसिव्ह कॅप्टन आणि कॅप्टनसी मटेरियल म्हणून ओळख मिळाली.
In 2008, the @imVkohli-led side won India's second #U19CWC title by beating South Africa in the final! 🏆
How many from that squad went on to play for #TeamIndia later on❓
Let us know in the comments ✍️ pic.twitter.com/pTHJI1kFEu
— BCCI (@BCCI) February 4, 2022
‘वर्ल्डकप विनिंग कॅप्टन’ म्हणून विराटला ग्लॅमर मिळाल. तो टीम इंडियातही आला. आयपीएलमध्ये आरसीबीचा आणि टीम इंडियाचा प्रमुख बॅटर बनला. दिवसागणिक आपल्यात सुधारणा करत विराटने टीम इंडियाच्या कॅप्टनपदापर्यंत मजल मारली. आज जगातील सर्वात यशस्वी क्रिकेटर म्हणून त्याचं नाव घेतलं जातंय. वयाच्या पस्तीशीआधी तो खेळाचा दिग्गज बनलाय. दुसरीकडे तन्मय श्रीवास्तव फक्त डोमेस्टिक क्रिकेट खेळत राहिला. नव्वदेक फर्स्ट क्लास मॅच त्याने खेळल्या. आयपीएल करिअर सात मॅचच्या पुढे गेले नाही. 2020मध्ये अगदी नैराश्यातून त्याने वयाच्या तिसाव्या वर्षी रिटायरमेंटची घोषणा केली.
असं म्हटलं जातं की, अंडर नाईन्टीन वर्ल्डकपमध्ये कॅप्टन्सी न मिळाल्याने तो कमालीचा निराश झालेला. पुढे बीसीसीआयला देखील त्याच्या टॅलेंटचा वापर करता आला नाही. एक फ्युचर स्टार म्हणून पाहिले जात असलेला तन्मय भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून नोंद होता-होता राहिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘सुपरमॅक्स क्रिकेट’मध्ये होते जगावेगळे नियम, वाईडला मिळायच्या 2 धावा; पण एकाच मॅचनंतर झालं बंद, कारण…
आयोजकाने पासेस नाकारले अन् भारतीय मंत्र्याची सटकली, धीरुभाईंची मदत घेत भारतात ‘असं’ केलं वर्ल्डकपचं आयोजन